यालाच म्हणतात आदर्श शिक्षिका.


(छायाचित्र जगन्नाथ माळी) 


मेंढपाळ कुटुंबातील मुले शिक्षणाच्या प्रवाहात


उंडाळे दि. (जगन्नाथ माळी याज कडून) 


शिक्षिकेच्या जागृत पणामुळे शैक्षणिक प्रवाहापासून ताटातूट झालेल्या भटक्या मेंढपाळ कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात यश आले. याबाबत अधिक माहिती अशी, साळशिंरबे तालुका कराड येथील कु. एस. व्ही. पाटील या येथील स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर विद्यालयात शिक्षक आहेत. त्यांच्या शेतामध्ये कर्नाटकहून भटकत आलेल्या रामा कोरे या मेंढपाळाच्या मेंढ्या बसवल्या आहेत. श्री कोरे यांचे संपूर्ण कुटुंब त्यांच्या बरोबर आहे. त्यांच्या सोबत बिवा व सत्यवा ही दोन लहान मुले होती कु. पाटील यांच्या निदर्शनास आले. त्यांनी कुटुंबाची चौकशी करुन लहान मुलांना कोरोना बाबत काय केले पाहिजे या संदर्भात माहिती दिली. त्यांना या आजाराबाबत माहिती देऊन त्यांना मास्क, कपडे दिले. तसेच त्यांना शाळे विषयी मार्गदर्शन केले. सुरुवातीला त्यांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून छोट्या छोट्या गोष्टी सांगणे, गाणी, कविता, याद्वारे त्यांना शिक्षणाची गोडी निर्माण केली. त्यांना प्रतिसाद देऊ लागली सहा दिवस कुटुंब कु. पाटील यांच्या शेतात होते. या दिवसात कु. पाटील यांनी शिक्षणाचे अनेक धडे दिले. की मुले अभ्यासात रंगून गेली. आता कुटुंबाबरोबर अन्यत्र भटकत गेल्यावर ही मुले फोनवरून पाटील मॅडम यांना काल काही अभ्यास केला हे सांगताहेत अशाप्रकारे आज कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असताना नियमित विद्यार्थी शाळेपासून दूर आहेत मात्र ऑनलाइन अध्यापनाच्या माध्यमातून हे विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहात तरी आहेत. मात्र बिवा, सत्यवा भटक्या कुटुंबातली मुले शाळाबाह्य त्यांना या करणामुळे शैक्षणिक प्रवास त्यांचा संपर्क पूर्ण तुटलेला मात्र कु. पाटील यांनी या मुलांमधील विद्यार्थी हेरला आणि त्यांना शैक्षणिक प्रवाहात आणले. या जागृते मुळे परिसरातून त्याचे कौतुक होत आहे. फोटो ओळी. साळशिंरबे.. कुटुंबातील लोकांशी संवाद साधताना कु. एस. व्ही. पाटील