उंडाळे येथील युवकांची अशी ही सामाजिक बांधिलकी.


उंडाळे : श्रमदानातून स्वच्छता करताना युवक कार्यकर्ते. छायाचित्र जगन्नाथ माळी


माळी गल्लीतील युवकांनी लॉकडाऊनचा कालावधी लावला सत्कारणी.परिसर स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबिवले. 


उंडाळे / प्रतिनिधी 


उंडाळे ता. कराड येथील माळी गल्ली येथील युवक कार्यकर्त्यांनी लाँकडाऊनच्या काळात माळी गल्ली, महादेव मंदिर, स्मशानभूमी परिसर, दक्षिण मांड नदीचा घाट यांची श्रमदानाने सफाई करत मोकळा वेळ सत्कारणी लावला. सातारा जिल्ह्यात सध्या लाँकडाऊनचा कालावधी आहे. या कालावधीमध्ये शेतातील कामे करून जो मोकळा वेळ आहे. त्या कालावधीमध्ये इकडे तिकडे किंवा मोबाईल वर चॅटिंग यामध्ये वेळ न घालवता शनिवार सायंकाळी माळी गल्लीतील कार्यकर्त्यांनी आपली गल्ली श्रमदान करून आपण स्वच्छता करू या अशा पद्धतीची बैठक घेण्यात आली. रविवारी सकाळी युवक कार्यकर्ते एकत्र होऊन श्रमदानला सुरुवात केली प्रथम माळी गल्ली गल्लीतील रस्ते गटार त्यानंतरश्रावण महिना नुकताच सुरु झाल्याने महादेव मंदिर परिसर, परिसरातील गवत. खुरपे, खोरे, यांच्या साहाय्याने काढून परिसर चकाचक करण्यात आला. स्मशानभूमी परिसर व नदीवरील घाट यांची स्वच्छता करण्यात आली.परिसराचे औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले. रविवार सकाळपासून दहा वाजेपर्यंत ही स्वच्छता करण्यात आली संपूर्ण परिसर चकाचक केला या उपक्रमाबद्दल सर्वत्र या युवकांचे कौतुक होत आहे.