माथाडी कामगार आणि सुरक्षा रक्षकांनाही ‘कोरोना’ काळात ५० लाखांचे विमा संरक्षण.


उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्याशी चर्चा करतांना माथाडी कामगार संघटना


ढेबेवाडी ( प्रतिनिधी ) माथाडी व सुरक्षा रक्षक कामगारांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करुन त्यांना कोव्हिड-१९ संबंधित विमा कवच संरक्षण देण्याचा निर्णय आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री ना.अजितदादा पवार यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकित घेतला.


नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तूंच्या मालाची चढ-उताराची कामे करणा-या माथाडी कामगार व सुरक्षा देणा-या सुरक्षा रक्षक कामगारांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करुन त्यांना कोव्हिड-१९ संबंधित विमा कवच संरक्षण देण्यासंबंधी उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्यासमोर मंत्रालयात आयोजित केलेल्या बैठकिस कामगार मंत्री मा. दिलीप वळसे पाटील तसेच वित्त, गृह व कामगार विभागाचे अधिकारी तसेच महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार युनियनचे नेते ना. नरेंद्र पाटील,आ.शशिकांत शिंदे,सुरक्षा रक्षक युनियनचे अजिंक्य भोसले आदी उपस्थित होते.


कोरोना या महाभयंकर संसर्गजन्य विषाणूला रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने दि.२२ मार्च, २०२० पासून संपुर्ण ठिकाणी लॉकडाऊन जाहिर केला होता. राज्य शासनाच्या आवाहनानुसार नव्यामुंबईतील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीची अन्न- धान्य मार्केटसह सर्व मार्केट, महाराष्ट्रातील इतर कृषि उत्पन्न बाजार समितीत्या चालू ठेवण्यात आल्या होत्या.


          या आवारात जीवनावश्यक वस्तूंच्या मालाची तसेच गॅस सिलेंडर कंपन्या,खत कारखाने,रेल्वे माल धक्क्यावर येणारा अन्न थान्य,डाळी,खते या मालाची चढ-उताराची कामे विविध नोंदीतअसलेले माथाडी, कामगारासह सर्व कामगार करीत आहेत.व सुरक्षा देण्याचे काम सुरक्षा रक्षक करीत आहेत.


 


लॉकडाऊन कालावधीत कोरोनाचा होऊन अनेक माथाडी कामगार तसेच सुरक्षा देणा-या सुरक्षा रक्षक कामगारांचा आणि अनेक व्यापा-यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे त्याच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य होण्याकरीता केंद्र व राज्य शासनाच्या कोव्हिड-१९ संबंधित डॉक्टर्स,नर्सेस ,पोलीस, पालिका कर्मचारी यांना अत्यावश्यक सेवेतील घटक म्हणून विमा कवच संरक्षण/भरपाई देण्याची तरतुद करण्यात आली आहे,त्याप्रमाणे माथाडी, सुरक्षा रक्षक कामगार व अन्य घटकांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करुन त्यांना कोव्हिड-१९ संबंधित विमा कवच संरक्षण/भरपाई मिळावी,कोरोनाची बाधा झाल्यास त्याला औषधोपचारावर खर्च करण्यासाठी मेडिक्लेम विमा उतरावा कोरोना बाधा होऊ नये म्हणून आवश्यकत्या मास्क सॅनिटायझर इत्यादी सुविधा उपलब्ध करुन द्यावी, त्यांना रेल्वेने प्रवास करण्यास QR Code E-Pass पास देण्याची व्यवस्था व्हावी या व अन्य मागण्यां युनियनने शासना कडे सादर केल्या होत्या.


       माथाडी व सुरक्षा रक्षक कामगारांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करुन त्यांना कोव्हिड-१९ संबंधित विमा कवच संरक्षण देण्याचा तसेच रेल्वेने प्रवास करण्यासाठी QR Code E-Pass पास देण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे माथाडी व सुरक्षा रक्षक कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.