दि.बा.पाटील यांच्या 'बाबा मास्तर' या व्यक्ती चित्राचा शिवाजी विद्यापीठाने केला गौरव.


 दि.बा.पाटील यांच्या 'बाबा मास्तर' या व्यक्ती चित्राचा शिवाजी विद्यापीठाने केला गौरव.


सांगली : कामेरी ता वाळवा येथील जेष्ठ साहित्यिक व कादंबरीकार दि .बा पाटील यांच्या 'बाबा मास्तर' या व्यक्ती चित्राचा शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर ने सन 2020 पासूनच्या शैक्षणिक वर्षा साठी बी. ए भाग 3 च्या अभ्यासक्रमात समावेश केला आहे.


दि .बा. पाटील यांनी आत्तापर्यंत 11 कादंबऱ्या ,3 कथासंग्रह 1 व्यक्ती चित्र लिहिले असून त्यांच्या हिरवा चुडा या कथासंग्रहास राज्य पुरस्कार मिळालाा होता.


विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाने संपादित केलेल्या 'मुलखा वेगळी माणस' या पाठ्य पुस्तकात दि. बा पाटील यांच्या 'बाबा मास्तर' या व्यक्तीचित्रा सह प्र.के. अत्रे,व्यंकटेश माडगूळकर , आण्णा भाऊ साठे,उत्तम कांबळे,विभावरी शिरपूरकर , व.बा .बोधे,अरुण खोपकर,इंद्रजित भालेराव, सयाजीराजे मोकाशी,व्ही. एन.शिंदे ,हमीद दलवाई या प्रख्यात मान्यवर लेखकांच्या साहित्याचा समावेश आहे.


 'मुलखा वेगळी माणस' या पाठ्य पुस्तकातून विद्यार्थ्यांना ग्रामीण व उपेक्षितांच्या जीवनाचे आकलन होणार आहे.तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक,सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, पर्यावरण आणि कौटुंबिक भावविश्व अभ्यासता येणार आहे.


Popular posts
कोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय!
इमेज
तुकाराम गुरव यांचे दुःखद निधन
इमेज
चंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.
इमेज
श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा धार्मिक व सामाजिक उपक्रमाने उत्साहात संपन्न.
इमेज
शैक्षणिक व आरोग्य व्यवस्था मजबूत करा तसेच खेळाडूंसाठी तळमावलेत क्रीडा संकुल उभारा : मारुतीराव मोळावडे.
इमेज