प्रा.सचिन पुजारी यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर. 


 प्रा.सचिन पुजारी यांना यशवंतराव चव्हाण फाऊंडेशन मुंबई यांचेकडून पुरस्कार जाहीर. 


कुंभारगांव / प्रतिनिधी 


कुंभारगाव ता पाटण येथील प्रा.सचिन बसाप्पा पुजारी हे काकासाहेब चव्हाण महाविद्यालय तळमावले ता पाटण येथे प्राध्यापक म्हणून काम करतात, महाविद्यालयांतील, शैक्षणिक क्षेत्रात व अन्य राजकीय, सामाजिक कार्यक्रमामध्ये सूत्र संचलन करून आपल्या शब्दांची छाप पाडण्याचा प्रयत्न केला ते आज अखेर चालूच असून, सर मनाने मनमिळावू असून महाविद्यालातील अनेक विद्यार्थ्याना शालेय अडचणी आल्यास स्वतः पुढाकार घेऊन सोडवण्या साठी पुढाकार घेताना दिसतात त्यांच्या शैक्षणीक, राजकीय, सामाजिक कार्याची दखल घेऊन, व पुढील वाटचालीस प्रोत्साहन व प्रेरणा मिळावी या दूरदृष्टीचा विचार करून यशवंतराव चव्हाण फौंडेशन मुंबई यांच्या वतीने प्रा.सचिन बसाप्पा पुजारी रा. कुंभारगाव, यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 


तसेच  प्रा.सचिन बसप्पा पुजारी संजीवनी प्रतिष्ठान कुंभारगाव ता. पाटण मध्ये सचिव या पदावर कार्यरत आहेत. 


           त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने कुंभारगाव व काळगाव विभागातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे त्यांना  


पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा . 


Popular posts
कोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय!
इमेज
तुकाराम गुरव यांचे दुःखद निधन
इमेज
चंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.
इमेज
श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा धार्मिक व सामाजिक उपक्रमाने उत्साहात संपन्न.
इमेज
शैक्षणिक व आरोग्य व्यवस्था मजबूत करा तसेच खेळाडूंसाठी तळमावलेत क्रीडा संकुल उभारा : मारुतीराव मोळावडे.
इमेज