मर्चंट सिंडीकेट पतसंस्थेचे राज्य शासनाकडून विशेष आभार


 


मर्चंट सिंडीकेट पतसंस्थेचे राज्य शासनाकडून विशेष आभार 


तळमावले दि. प्रतिनिधी


 तळमावले तालुका पाटण येथील मर्चंट सिंडिकेट पतसंस्थेने कोरोना विषाणू चे प्रादुर्भावा मध्ये सामाजिक बांधिलकी जपत पतसंस्थेच्या वतीने 25 हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिली आहे. राज्यांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असणाऱ्या संचार बंदीच्या काळात सर्व यंत्रणा ठप्प असताना राज्याचे मुख्यमंत्री नामदार: उद्धवजी ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीस राज्यातील जनतेस मदत करण्याचे आव्हान केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत मर्चंट सिंडिकेट या पतसंस्थेने 25 हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिली आहे. या बद्दल राज्याचे मुख्यमंत्री यांच्या वतीने राज्याचे गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी यासंस्थेचे आभार व्यक्त केले आहे. तशा आशयाचे आभाराचे पत्र संस्थेस दिले आहे. 


पतसंस्थेच्या या छोट्याशा मदतीची देखील राज्याचे मुख्यमंत्री न. उद्धवजी  ठाकरे व राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी दखल घेतल्याबद्दल मर्चंट सिंडीकेट पतसंस्थेचे चेअरमन अनिल शिंदे व त्यांच्या सर्व संचालकांनी आभार व्यक्त केले आहे.