गृहराज्यमंत्री ना.शंभुराज देसाई यांचा दौरा


गृहराज्यमंत्री ना.शंभुराज देसाई यांचा दौरा


    सातारा दि. 20(जिमाका) : राज्याचे गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन राज्यमंत्री शंभुराज देसाई हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा पुढील प्रमाणे.


    मंगळवार दि. 21 जुलै रोजी सकाळी 10 वा. शासकीय मोटारीने सातारा निवास्थान येथून वाईकडे प्रयाण. सकाळी 10.45 वा. वाई येथील लॉकडॉऊनच्या काळातील कायदा व सुव्यवस्था पाहणी दौरा. सकाळी 11.30 वा. वाई येथून लोणंदकडे प्रयाण. दुपारी 12.45 वा. लोणंद येथील लॉकडॉऊनच्या काळातील कायदा व सुव्यवस्था पाहणी दौरा. दुपारी 1.30 वाव. लोणंद येथून फलटणकडे प्रयाण. दुपारी 2.45 वा. फलटण येथील लॉकडॉऊनच्या काळातील कायदा व सुव्यवस्था पाहणी दौरा. दुपारी 3.30 वा. फलटण येथून दहिवडीकडे प्रयाण. सायं. 4.15 वा. दहिवडी येथील लॉकडॉऊनच्या काळातील कायदा व सुव्यवस्था पाहणी दौरा. सायं. 5 वा. दहिवडी येथून कराड मार्गे साबळेवाडी, ता. पाटणकडे प्रयाण. सायं. 7 वा. साबळेवाडी येथे सांत्वनपर भेट. सायं. 7.30 वा. दौलतनगर, ता. पाटण निवासस्थानकडे प्रयाण. आगमन व मुक्काम.


    बुधवार दि. 22 जुलै रोजी सकाळी 10.30 वा. शासकीय मोटारीने दौलतनगर, ता. पाटण निवासस्थान येथून शासकीय विश्रामगृह पाटणकडे प्रयाण. सकाळी 11 वा. महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे डोंगरी आराखड्यातील कामासंदर्भात आयोजित आढावा बैइकीस उपस्थिती (स्थळ: शासकीय विश्रामगृह, पाटण). सकाळी 11.30 वा. कोयना पर्यटन संदर्भात मंजूर झालेल्या कमांचा सद्य:स्थिती आढावा व वन्यजीव विभागामार्फत प्रस्तावित कामांची सद्यस्थिती आढावा बैठकीस उपस्थिती (स्थळ: शासकीय विश्रामगृह, पाटण). सोयीनुसार शासकीय विश्रामगृह पाटण येथून सातारा येथील निवासस्थानाकडे प्रयाण. आगमन व मुक्काम.


    गुरुवार दि. 23 जुलै व शुक्रवार दि. 24 जुलै रोजी सातारा येथे मुक्काम. शनिवार दि. 25 जुलै रोजी सकाळी 11 वा. सातारा निवासस्थान येथून दौलतनगर ता. पाटणकडे प्रयाण आगमन व मुक्काम. रविवार दि. 26 जुलै रोजी सोईनुसार दौलतनगर, ता पाटण येथून सातारा निवासस्थानकडे प्रयाण. आगमन व मुक्काम.


    सोमवार दि. 27 जुलै रोजी सकाळी 11 वा. शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उध्दवजी ठाकरेसाहेब यांचे 60 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित सातारा जिल्ह्यात विविध कार्यक्रमांना उपस्थिती व ऑनलाईन शाखा उद्घाटन कार्यक्रमांना उपस्थिती (स्थळ : सातारा). सोईनुसार सातरा येथून मुंबईकडे प्रयाण.


    गुरुवार दि. 30 जुलै रोजी मुंबई येथून सातारा निवासस्थानकडे प्रयाण . आगमन व मुक्कमा.