जिल्ह्यातील 95 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित.


जिल्ह्यातील 95 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित


सातारा दि. 21 (जि. मा. का) : काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार जिल्ह्यातील 89 आणि रात्री उशीरा अँटिजन टेस्ट किटद्वारे 6 असे एकूण 95जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. 


कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे.


 वाई तालुक्यातील बोपेगाव येथील 41 व 35 वर्षीय पुरुष, शेंदुर्जणे येथील 65 वर्षाचा पुरुष, 12 वर्षाचा युवक, 48 वर्षाचा पुरुष व 28 वर्षाची महिला


 खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील 38 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 33 वर्षीय पुरुष, 71 वर्षीय महिला


 सातारा तालुक्यातील खावली येथील 30 वर्षीय पुरुष, खिंडवाडी येथील 37 वर्षीय महिला, 75 वर्षीय पुरुष, रविवार पेठ, सातारा येथील 70 वर्षीय महिला, शनिवार पेठ येथील 51 वर्षीय महिला, नागठाणे, गणेशवाडी येथील 45 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ, सातारा येथील 39 वर्षीय पुरुष 


 खटाव तालुक्यातील वडूज येथील 32 व 26 वर्षीय महिला, डिस्कळ येथील 58 वर्षीय महिला, 47 वर्षीय पुरुष, 59 वर्षीय महिला, वडूज येथील 23 वर्षीय महिला, नेर येथील 63, 45 वर्षीय पुरुष


 माण तालुक्यातील दहिवडी येथील 65 वर्षीय पुरुष


 कोरेगाव तालुक्यातील बनवडी येथील 64 वर्षीय पुरुष, वाठार किलोली येथील 85 वर्षीय महिला


 फलटण तालुक्यातील लक्ष्मीनगर, फलटण येथील 42 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला, 49 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय पुरुष, सासवड येथील 24 वर्षीय महिला, वारेवस्ती, खामगाव येथील 62 वर्षीय पुरुष, 55 वर्षीय महिला, 24, 52, 25, 22, 70, 26 वर्षीय पुरुष, 45 व 20 वर्षीय महिला, साखरवाडी लक्ष्मीवाडी येथील 50 वर्षीय पुरुष, 19 वर्षाची महिला


 पाटण तालुक्यातील नेरले येथील 51, 52 वर्षीय पुरुष, 45, 15, 28 वर्षीय महिला


 महाबळेश्वर तालुक्यातील गोडवली येथील 20, 18, 36, 27 वर्षीय पुरुष, 20, 25, 46 वर्षाची महिला व 1 वर्षाची बालिका, भिलार येथील 38 वर्षीय पुरुष


  कराड तालुक्यातील उंब्रज येथील 62 वर्षीय पुरुष, वराडे येथील 39 वर्षीय पुरुष, उंब्रज येथील 55 वर्षीय महिला, वराडे येथील 45, 45, 49 वर्षीय पुरुष,कालगाव येथील 20 वर्षीय महिला, आगाशिवनगर येथील 32 वर्षीय पुरुष, उंब्रज येथील 36,63 पुरुष, 25 वर्षीय महिला, कोळे येथील 34, 25 वर्षीय पुरुष, शामगाव येथील 34 वर्षीय पुरुष, बेलवडे, बुद्रुक येथील 24 वर्षीय पुरुष, कासारशिरंबे येथील 14 वर्षाची युवती, कराड येथील 34 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 58 वर्षीय पुरुष, कराड येथील 27 वर्षीय पुरुष्, कालवडे येथील 67 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ, कराड येथील 44 वर्षीय महिला, 16 वर्षाची युवती, मलकापूर येथील 55 वर्षीय महिला, बुधवार पेठ, कराड येथील 30 वर्षीय महिला, कालवडे येथील 58 वर्षीय महिला, आगाशिवनगर येथील 24 वर्षीय पुरुष, कराड येथील 18 वर्षीय युवक 


अँटिजन टेस्ट्सनुसार जावली तालुक्यातील दापवडी येथील 29 वर्षीय महिला, 56 वर्षीय पुरुष, शाहूनगर, सातारा येथील 38 वर्षीय पुरुष व 2 वर्षाचा बालक, वाई तालुक्यातील शेंदुर्जणे येथील 30 वर्षाची महिला, 4 वर्षाची बालिका, 13 वर्षाचा युवक, सिध्दांतवाडी येथील 34 पुरुष,3 वर्षाची बालिका, पोलीस लाईन, वाई येथील 32 वर्षीय पुरुष, असे एकुण 10 जण बाधित.