7 नागरिकांना डिस्चार्ज तर 126 नागरिकांचे घशातील नमुने तपासणीला
सातारा दि. 5 (जिमाका) : जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटर मधील उपचार घेवून बरे झालेल्या 7 रुग्णांना दहा दिवसानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
यामध्ये पाटण तालुक्यातील चाफळ येथील 27 वर्षीय पुरुष
खटाव तालुक्यातील मायणी येथील 27 वर्षीय पुरुष
सातारा तालुक्यातील पाटखळ माथा येथील 28 वर्षीय पुरुष व राजापुरी येथील 39 वर्षीय पुरुष
खंडाळा तालुक्यातील सवली येथील 27 वर्षीय् पुरुष, शिंदे वस्ती (लोणंद) येथील 37 वर्षीय् महिला.
वाई तालुक्यातील वाई शहरातील एका पुरुषाचा समावेश आहे.
126 नागरिकांचे नमुने पाठविले तपासणीला
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा यथील 63, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथील 13, पानमळेवाडी येथील 10, मायणी येथील 14, महाबळेश्वर येथील 9, खावली येथील 17 असे एकूण 126 नागरिकांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस.पुणे येथे तपासणीला पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
घेतलेले एकुण नमुने
14842
एकूण बाधित 1304
घरी सोडण्यात आलेले 791
मृत्यु 55
उपचारार्थ रुग्ण 458