श्री संतकृपा डी फार्मसीचा निकाल शंभर टक्के.


श्री संतकृपा डी फार्मसीचा निकाल शंभर टक्के. 


श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्मसी) घोगाव या महाविद्यालयातील प्रथम वर्षाचा निकाल शंभर टक्के लागला आहे .


सन २०२०-२१ या वर्षात शिक्षण घेत असलेल्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला असून, त्यांनी यावर्षीही शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. 


यावर्षी पूजा कर्णवार हिने ९६.०९ टक्के गुण संपादन करून महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला  असून असमा अत्तार  हिने ९५.०० टक्के गुण संपादन करून द्वितीय क्रमांक पटकावला तर नितीन लोहार याने ९४.९१ टक्के गुण संपादन करून तृतीय क्रमांक पटकावला. 


या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष शशिकांत पाटील, उपाध्यक्ष डॉ.उषा जोहरी, सचिव प्रसून जोहरी, प्राचार्या वैशाली महाडिक, शिक्षक व  शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.