जिल्ह्यातील 48 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित


जिल्ह्यातील 48 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित


 


सातारा दि. 1 (जि. मा. का): काल रात्री उशीरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटर मध्ये येथे उपचार घेत असलेल्यामध्ये निकट सहवासित 37, प्रवास करुन आलेले 5, सारी 5, आय.एल.आय (ILI) 1 असे एकूण 48 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.


            यामध्ये कराड तालुक्यातील महारुगडेवाडी येथील 21 व 46 वर्षीय पुरुष, 75 वर्षीय महिला, रुक्मिणी नगर येथील 39 वर्षीय पुरुष, तारुख येथील 22,54,32,40,35 वर्षीय महिला व 11 वर्षीय युवक व 60,44 वर्षीय पुरुष, तुळसन येथील 3 वर्षाची बालिका, शनिवार पेठ येथील 22 व 26 वर्षीय पुरुष, 23,45,70 वर्षीय महिला, ओंड येथील 36 वर्षीय पुरुष. मलकापूर येथील 36, 34 वर्षीय पुरुष व 18 वर्षीय युवती.


पाटण तालुक्यातील नवसरी येथील 15 व 17 वर्षीय युवक तसेच 36 वर्षीय महिला, पालेकर वाडी येथील 50 वर्षीय पुरुष, सदा दाढोली येथील 11 व 29 वर्षीय महिला व 4 वर्षाची बालिका.  


सातारा तालुक्यातील नागठाणे येथील 45 वर्षीय महिला, रविवार पेठ येथील 39 वर्षीय पुरुष.


माण तालुक्यातील खडकी पाटोळे येथील 62 वर्षीय पुरुष.


खटाव तालुक्यातील निमसोड येथील 68 वर्षीय महिला, कन्नवडी मायणी येथील 75 वर्षीय् पुरुष, राजाचे कुर्ले येथील 33 वर्षीय पुरुष.


कोरेगाव तालुक्यातील करंजखोप येथील 8 वर्षीय बालिका.


खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 22,24,32,25 वर्षीय पुरुष व 19 व 49 वर्षीय महिला.


फलटण तालुक्यातील कुरवली येथील 4 वर्षीय बालक, कोरेगाव येथील 5 वर्षीय बालक, जाधववाडी येथील 43 वर्षीय पुरुष, आंदरुड येथील 35 वर्षीय पुरुष, गुणवरे येथील 51 वर्षीय पुरुष.


जावळी तालुक्यातील मार्ली येथील 82 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.


Popular posts
बंडखोरांना इशारा ते राजीनाम्याची तयारी... उद्धव ठाकरेंच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे
इमेज
वा..वा..वा...प्रत्यक्षात भेटू त्यावेळी काढू फोटो... प्रवीणजी तरडे यांनी दिली स्वतःच्या चित्राला दाद
इमेज
कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स च्या विद्यार्थ्यांचे दहावी बोर्ड परीक्षेमध्ये घवघवीत यश
इमेज
ज्ञानाची शिदोरी’ उपक्रमात सहभागी होण्याचे ‘स्पंदन’ ट्रस्ट चे आवाहन
इमेज
काजारवाडी येथील वि.का.स. सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी सुभाष काजारी तर व्हा. चेअरमन पदी हणमंत जंगम यांची बिनविरोध निवड.
इमेज