48 नागरिकांना आज डिस्चार्ज तर 523 जणांचे नमुने पाठविले तपासणीला


48 नागरिकांना आज डिस्चार्ज तर 523 जणांचे नमुने पाठविले तपासणीला


 


सातारा दि.9(जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 48 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.


 


यामध्ये जावली तालुक्यातील आखेगणी येथील 65 वर्षीय पुरुष, 16 वर्षीय युवक, 40 वर्षीय महिला, बीरमानेवाडी येथील 52 वर्षीय पुरुष, बामणोली येथील 46 वर्षीय पुरुष, रामवाडी येथील 57, 42, 48, 43, 55 वर्षीय महिला, 48वर्षीय पुरुष


 


 कोरेगाव तालुक्यातील चौधरीवाडी येथील 32 वर्षीय पुरुष, करंजखोप येथील 8 वर्षाची बालिका, जांभ खुर्द येथील 31 वर्षीय पुरुष, दुरगळवाडी येथील 23 वर्षीय पुरुष


 


 कराड तालुक्यातील महारुगडेवाडी येथील 21 व 46 वर्षीय पुरुष, 75 वर्षीय महिला, तारुख येथील 22, 54, 32, 35 वर्षीय महिला, 11 वर्षाचा बालक, 40 वर्षीय पुरुष, काळेवाडी येथील 8 वर्षाचा बालक, तुळसण येथील 60 वर्षीय पुरुष, कराड येथील घोलेश्वर येथील 46 वर्षीय पुरुष, उंब्रज येथील 47 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला, मलकापूर येथील 1 पुरुष


 


 खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील न्यु कॉलनी येथील 60 वर्षीय महिला, येलगाव येथील 65 वर्षीय पुरुष, हिंगणोली येथील 54 वर्षीय पुरुष, बनवडी येथील 32 वर्षीय पुरुष


 


 वाई तालुक्यातील धरमपुरी येथील 35 वर्षीय पुरुष


 


 सातारा तालुक्यातील दौलतनगर येथील 39 वर्षीय पुरुष, रेल्वेस्टेशन येथील 32 वर्षीय पुरुष, लिंब येथील 40 वर्षीय पुरुष


 


 पाटण तालुक्यातील उरुल येथील 30 वर्षीय पुरुष, बोडरी येथील 34 वर्षीय पुरुष, सांगवड येथील 31 वर्षीय पुरुष


 


 फलटण रविवार पेठ येथील 68, 25, 62,60 वर्षीय महिला, जिंती येथील 44 वर्षीय महिला, गुणवरे येथील 51 वर्षीय पुरुष, आदरुड येथील 35 वर्षीय पुरुष.


 


 523 जणांचे नमुने पाठविले तपासणीला


 


क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 22, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 71, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 57, ग्रामीण रुग्णालय फलटण येथील 20, कोरेगाव येथील 27, वाई येथील 40, शिरवळ येथील 92, रायगाव येथील 23, पानमळेवाडी येथील 42, मायणी येथील 9, महाबळेश्वर येथील 13, पाटण येथील 79, खावली येथील 28 असे एकूण 523 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस. पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे, असेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.