जिल्ह्यातील 46 नागरिकांचे अहवाल कोरोना  बाधित तर तीन बाधितांचा मृत्यू


जिल्ह्यातील 46 नागरिकांचे अहवाल कोरोना 


बाधित तर तीन बाधितांचा मृत्यू


सातारा दि. 8 (जि. मा. का) : काल रात्री उशीरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटर मध्ये येथे उपचार घेत असलेल्यामध्ये निकट सहवासित 39, प्रवास करुन आलेले 4, सारीचे व आयएलआय 3 असे एकूण 46 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आले आला आहे. तसेच जावली तालुक्यातील कुसुंबी येथील 35 वर्षीय, पुनवडी येथील 60 वर्षीय व पाटण तालुक्यातील शिवतापवाडी येथील 64 वर्षीय पुरुष या तीन कोरोना बाधितांचा मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.


 


कोरोना बाधितांमध्ये पाटण तालुक्यातील गोकुळ येथील 29 वर्षीय महिला, कोयना नगर येथील 45, 48, 60 वर्षीय पुरुष,कामरगाव येथील 40 वर्षीय पुरुष, दबाचामाळ येथील 14 वर्षीय युवक, कडवे बुद्रुक येथील 35 वर्षीय पुरुष, सदादाढोली येथील 85 वर्षीय महिला,


माण तालुक्यातील म्हसवड येथील 53 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला, 16 वर्षीय युवती, दोरगेवाडी येथील 22, 55, वर्षीय महिला व 13 व 19 वर्षी युवती, 40 वर्षीय पुरुष, इंजबाव येथील 28 वर्षीय पुरुष, मार्डी येथील 42 वर्षीय महिला, गोंदवले बुद्रुक येथील 40 वर्षीय पुरुष व 37 वर्षीय महिला,


कराड तालुक्यातील तारुख येथील 48 वर्षीय पुरुष, कोटीवले येथील 30 वर्षीय महिला, तारुख येथील 26 वर्षीय महिला, शामगाव येथील 49 वर्षीय पुरुष, सुपणे येथील 28 वर्षीय पुरुष


सातारा तालुक्यातील जिहे येथील 7 वर्षाचा बालक, खावली येथील 52 वर्षीय पुरुष, जिहे येथील 50 वर्षीय पुरुष, 70 व 85 वर्षीय महिला, भरतगाव येथील 48 वर्षीय पुरुष, गोजेगाव येथील 34 वर्षीय पुरुष, कण्हेर येथील 32 वर्षीय पुरुष, शिवाजीनगर, सातारा येथील 45 वर्षीय पुरुष, यादवगोपाळ पेठ, सातारा येथील 30 वर्षीय महिला.


वाई तालुक्यातील केंजळ येथील 23, 48, 27 वर्षीय पुरुष व 48,70, 25 वर्षीय महिला, पसरणी येथील 30 व 52, 44 वर्षीय महिला


जावली तालुक्यातील पुणवडी येथील 60 वर्षीय पुरुष, कास येथील 38 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.


तीन बाधिताचा मृत्यु


 क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे जावली तालुक्यातील कुसुंबी येथील 35 वर्षीय पुरुष, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे पाटण तालुक्यातील शिवतापवाडी येथील 64 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. तसेच जावली तालुक्यातील पुनवडी येथील 60 वर्षीय पुरुषाला उपचाराकरिता क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा दाखल करण्यात आले होते. त्याचा काल दुपारी उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. उपचारादरम्यान घेण्यात आलेला नमुना कोरोना बाधित आला आहे.


 


तसेच खासगी प्रयोग शाळेत तपाणी करुन कोरोना बाधित असलेला 28 वर्षीय पुरुष काल रात्री उशिरा मुंबई येथून प्रवास करुन क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल झाला आहे.