46 नागरिकांना आज डिस्चार्ज ;   एका बाधिताचा मृत्यु तर 340 जणांचे नमुने पाठविले तपासणीला 


 


46 नागरिकांना आज डिस्चार्ज ; 


 एका बाधिताचा मृत्यु तर 340 जणांचे नमुने पाठविले तपासणीला 


सातारा दि.7 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 46 जणांना आज 10 दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे तसेच फलटण तालुक्यातील फडतरवाडी येथील कोरोना बाधिताचा मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.


 


यामध्ये कराड तालुक्यातील खुबी येथील 19 वर्षीय युवक, उंब्रज येथील 43 वर्षीय पुरुष, चचेगाव येथील 40, 20, 65 वर्षीय महिला, 12 मुलगी, 8 वर्षाचा बालक व 34 वर्षीय पुरुष, मसूर येथील 10 वर्षीय बालक, 50 वर्षीय महिला, 56, 27 व 23 वर्षीय पुरुष, मालखेड येथील 60 वर्षीय पुरुष, येलगाव येथील 47 वर्षीय पुरुष, तारुख येथील 56 वर्षीय पुरुष, खंडोबानगर, मलकापूर येथील 30 वर्षीय पुरुष, पाटीलवाडी (म्हासोली) येथील 48 वर्षीय महिला


 


पाटण तालुक्यातील सितापवाडी येथील 60 व 28 वर्षीय महिला, 31 वर्षीय पुरुष, कर्टे येथील 49 वर्षीय पुरुष, पालेकरवाडी येथील 42 वर्षीय पुरुष  


 


जावली तालुक्यातील रामवाडी येथील 48, 26, 22, 40 व 18 वर्षीय महिला, 33, 30, 16 व 38 वर्षीय पुरुष व 1 वर्षाचा बालक, पिंपळवाडी येथील 45 वर्षीय पुरुष


 


खंडाळा तालुक्यातील शहाजी चौक शिरवळ येथील 20 व 42 वर्षीय पुरुष


 


माण तालुक्यातील खंडेवाडी (वारुडगड) येथील 33 वर्षीय पुरुष


 


सातारा तालुक्यातील जिहे येथील 50 वर्षीय पुरुष, दहिवडी (रोहोट) येथील 28 वर्षीय पुरुष, आर्वे येथील 55 वर्षीय पुरुष


 


कोरेगाव तालुक्यातील नागझरी येथील 28 व 26 वर्षीय पुरुष, किरोली येथील 26 व 28 वर्षीय पुरुष, बनवडी येथील 39 वर्षीय पुरुष


 


खटाव तालुक्यातील बोंबाळे येथील 60 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.


 


340 जणांचे नमुने पाठविले तपासणीला


क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 27, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 67, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 40, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 31, वाई येथील 23, शिरवळ येथील 72, रायगाव येथील 11, पानमळेवाडी येथील 26, मायणी येथील 16, खावली येथील 27 असे एकूण 340 जणांचे घशातील नमुने एन.सी.सी.एस, पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.


 


एका बाधिताचा मृत्यु


क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे फडतरवाडी ता. फलटण येथील 42 वर्षीय कोरोना बाधित पुरुषाचा उपचारदरम्यान आज सकाळी मृत्यु झाला असल्याचेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.


Popular posts
बंडखोरांना इशारा ते राजीनाम्याची तयारी... उद्धव ठाकरेंच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे
इमेज
वा..वा..वा...प्रत्यक्षात भेटू त्यावेळी काढू फोटो... प्रवीणजी तरडे यांनी दिली स्वतःच्या चित्राला दाद
इमेज
कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स च्या विद्यार्थ्यांचे दहावी बोर्ड परीक्षेमध्ये घवघवीत यश
इमेज
ज्ञानाची शिदोरी’ उपक्रमात सहभागी होण्याचे ‘स्पंदन’ ट्रस्ट चे आवाहन
इमेज
काजारवाडी येथील वि.का.स. सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी सुभाष काजारी तर व्हा. चेअरमन पदी हणमंत जंगम यांची बिनविरोध निवड.
इमेज