27 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज;259 जणांचे नमुने पाठविले तपासणीला


27 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज;259 जणांचे नमुने पाठविले तपासणीला


 


सातारा दि.12 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 27 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.


    यामध्ये जावली तालुक्यातील 52 वर्षीय महिला, करहर येथील 7 वर्षीय बालक, मरळी येथील 82 वर्षीय पुरुष, रामवाडी येथील 15,19,20 व 23 वर्षीय तरुणी व 12,48,58,60 व 27 वर्षीय पुरुष.


    माण तालुक्यातील कोळेवाडी येथील 36 वर्षीय पुरुष, क


कोरेगांव तालुक्यातील पवारवाडी येथील 65 वर्षीय पुरुष.


महाबळेश्वर येथील लेकवूड येथील 28 वर्षीय पुरुष,


खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 22 वर्षीय महिला व 24 व 25 वर्षीय पुरुष.


सातारा तालुक्यातील शाहुनगर येथील 20 वर्षीय पुरुष, जैतापूर येथील 30 वर्षीय पुरुष, भंडारी प्लाझा गोडोली येथील 32 वर्षीय पुरुष, निनाम पाडळी येथील 28 वर्षीय पुरुष, माळवाडी येथील 24 वर्षीय पुरुष, सिव्हील हॉस्पिटल येथील 48 वर्षीय महिला.


फलटण तालुक्यातील आंदरुड येथील 52 वर्षीय पुरुष व अलगुडेवाडी येथील 14 वर्षीय बालीका.


259 जणांचे नमुने पाठविले तपासणीला


    क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 25, ग्रामीण रुग्णालय फलटण येथील 3 , वाई येथील 38, खंडाळा येथील 80, रायगांव येथील 56, पानमळेवाडी येथील 31, मायणी येथील 9, महावळेश्वर येथील 4 खावली येथील 13 असे एकूण 259 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीकरीता एन.सी.सी.एस पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे पाठविण्यात आले असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.