सारीपाटातील 25 खेळाडूंनी सोडला सुटकेचा श्वास


कुंभारगांव येथील एका युवतीचा कोरोना रिपोर्ट आला पॉझिटिव्ह. 


अन्य ३ जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह


यामुळे सारीपाटातील 25 खेळाडूंनी सोडला सुटकेचा श्वास. 


कुंभारगांव (प्रतिनिधी) : मुंबई प्रवासाची हिस्ट्री असलेले कुटुंब 26 जून रोजी आपल्या मूळ गावी कुंभारगाव येथे आले होते यामध्ये 42 वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आल्याने कुंभारगांवा मध्ये खळबळ उडाली होती. त्यांच्या अती संपर्कातील चार जणांना तळमावले येथील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते .


यामध्ये आज ३ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत तर बाधित रुग्णाच्या 18 वर्षीय मुलगी चा रिपोर्ट मात्र पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तिला पुढील उपचाराकरिता कृष्णा हॉस्पिटल कराड येथे दाखल करण्यात येणार आहे .


या कुटुंबाच्या शेजारील एक युवक संपर्कात आला होता व तोच युवक कुंभारगांव येथे सारी पाट खेळायला गेला होता त्यावेळी येथील 25 मुलं या खेळात सहभागी झाली होती .


 त्यामुळे या 25 मुलांना प्रशासनाने होम क्वारंनटाईन केले होते .गेले आठ दिवस ही सर्व मुले व त्यांचे कुटुंब चिंतेत होते मात्र आज या खेळणाऱ्या युवकाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने या सर्व मुलांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी अखेर सुटकेचा श्वास सोडला. या मुलाच्या रिपोर्ट कडे सर्व कुंभारगांव विभागाचे लक्ष लागून राहिले होते .अखेर या सर्वांची चिंता मिटली आहे.