जिल्ह्यातील 14 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित

 



सातारा दि. 1 (जि. मा. का): जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटर मध्ये येथे उपचार घेत असलेल्यामध्ये निकट सहवासित 10 व प्रवास करुन आलेले 2, आय.एल.आय (ILI) 2 असे एकूण 14 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आले आहे. तसेच आज 3 जणांना 10 दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.


यामध्ये पाटण तालुक्यातील बेलवडी येथील 63 वर्षीय पुरुष


खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 75 वर्षीय महिला


माण तालुक्यातील काळेवाडी येथील 42 वर्षीय पुरुष, म्हसवड येथील 65, 50, 27 वर्षीय पुरुष व 26 वर्षीय महिला, 11 वर्षाची मुलगी


वाई तालुक्यातील चिंधवली येथील 28 वर्षीय पुरुष, ओझर्डे येथील 39 वर्षीय महिला, कवठे येथील 45 वर्षीय महिला, 28 वर्षीय महिला, सहयाद्रीनगर येथील 60 वर्षीय पुरुष व 39 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.


 


3 जणांना आज डिस्चार्ज


 


सातारा तालुक्यातील क्षेत्र माहुली येथील 47 वर्षीय महिला, 16 वर्षीय युवक व 19 वर्षाची युवती यांना आज 10 दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.


 


293 जणांचे नमुने पाठविले तपासणीला


 


क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, येथील 50, कृष्णा मेडिकल 61, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 70, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 30, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 2, वाई 5, रायगाव 44, पानमळेवाडी येथील 6, महाबळेश्वर 3, दहिवडी 22 असे एकूण 293 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस, पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.


Popular posts
कोरोना संक्रमिक रुग्ण संख्येवर नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी यांचे खाजगी डॉक्टर्स आणि हॉस्पिटलला आदेश
इमेज
शेंडेवाडी येथील दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह. जनतेने काळजी घेण्याचे डॉक्टरांचे आवाहन.
इमेज
सातारा जिल्ह्यात 182 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एका बाधिताचा मृत्यु
इमेज
मान्याचीवाडी ला "तालुका सुंदर गांव" पुरस्कार जाहीर.
इमेज
सातारा जिल्ह्यात महामार्ग वगळता रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी, जिल्ह्यातील शाळा मात्र सुरु राहणार .
इमेज