जिल्ह्यातील 10 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित तर दोन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु

 जिल्ह्यातील 10 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित तर दोन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु


5 नागरिकांना डिस्चार्ज तर 339 नागरिकांचे घशातील नमुने तपासणीला


 


सातारा दि. 4 (जिमाका) : जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटर मध्ये येथे उपचार घेत असलेल्या 10 नागरिकांचा अहवाल कोराना बाधित आला असून 6 पुरुष व 4 महिला यांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.


या कोरोना बाधितांमध्ये वाई तालुक्यातील उडतरे येथील 1, पसरणी येथील 1, वाई येथील 2. बदेवाडी येथील 1,


सातारा तालुक्यातील निनाम पाडळी येथील 1.


कराड तालुक्यातील कार्वेनाका येथील 25 वर्षीय महिला, तळबीड येथील 43 वर्षीय पुरुष.


खटाव तालुक्यातील शेणवडी येथील 26 वर्षीय पुरुष.


पाटण तालुक्यातील वाझोली येथील 32 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.


माण तालुक्यातील पळसवडे येथील 65 वर्षीय पुरुषाचा खाजगी प्रयोगशाळेत कोरोनाबाधित म्हणून अहवाल आलेल्या रुग्णास खाजगी हॉस्पिटलमधून क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचारासाठी पाठविले असता आज पहाटे उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला आहे. मेंदुतील रक्तस्त्राव झाल्याने खाजगी हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. अचानक श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्याची कोरोना तपासणी खाजगी प्रयोगशाळेतमार्फत करण्यात आली होती. त्यास मधुमेह व उच्चरक्तदाबाचा त्रास होता.


माण तालुक्यातील खडकी येथील 75 वर्षीय कोरोना बाधित महिलेचा कोरोना हेल्थ केअर सेंटर, मायणी येथे उपचारादरम्यान आज पहाटे मृत्यु झाला. तीची 6 वर्षापूर्वी ह्दय शस्त्रक्रिया झाली होती.


बऱ्या झालेल्या 5 जणांना आज डिस्चार्ज


कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथून 2, कारोना केअर सेंटर वाई येथून 2 व कारोना केअर सेंटर खावली येथून 1 असे एकूण 5 रुग्णांना दहा दिवसानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.


यामध्ये पाटण तालुक्यातील शेजवळवाडी येथील 49 वर्षीय महिला, सातारा तालुक्यातील लिंब गोवे येथील 36 वर्षीय पुरुष, कराड तालुक्यातील तारुख येथील 20 वर्षीय युवक, वाई तालुक्यातील कवठे येथील 20 वर्षीय् युवक व एकसर येथील 25 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.


339 नागरिकांचे घशातील नमुने तपासणीला


क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथुन 17, कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथुन 71, उपजिल्हा रुग्णालय कराड येथून 44, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथून 35, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथून 3, ग्रामीण रुग्णालय वाई येथून 41, शिरवळ येथुन 37, रायगांव येथून 36, पानमळेवाडी येथून 19, महाबळेश्वर येथून 3, खावली 33 असे एकूण 339 नागरिकांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस.पुणे येथे तपासणीला पाठविण्यात आले आहेत.


घेतलेले एकुण नमुने 14716


एकूण बाधित 1256


घरी सोडण्यात आलेले 784


मृत्यु 55


उपचारार्थ रुग्ण 417