कृष्णा मेडिकल कॉलेज येथील अकरा जणांना आज डिस्चार्ज


कृष्णा मेडिकल कॉलेज येथील अकरा जणांना आज डिस्चार्ज,


जिल्ह्यात आज पर्यंत 211 बरे होऊन गेले घरी


सातारा दि. 2 ( जि. मा. का ): कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असणारे 11 जण आज कोरोनातून पूर्णपणे बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले.


 


आज पर्यंत क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधासारण रुग्णालय, सह्याद्री हॉस्पिटल, जिल्ह्यातील कोरोना केअर सेंटर अशा विविध ठिकाणावरून आता पर्यंत 211 जण कोरोनातून बरे होऊन घरी गेले आहेत.


 


या कोरोनामुक्त मध्ये कराड तालुक्यातील खालकरवाडी चरेंगाव येथील 25 वर्षीय युवक, इंदोली येथील 37 वर्षीय महिला, 12 व 14 वर्षीय मुली, म्हासोली येथील 55,30,55 वर्षीय महिला व 9 वर्षीय मुलगा, पाटण तालुक्यातील शिराळ येथील 25 वर्षीय युवक, खाले येथील 21 वर्षीय महिला, बनपुरी येथील 16 वर्षीय युवक असे 11 कोरोना बाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला.