कोळे जिजाऊ अनाथ आश्रमास शिवसेनेची मदत


कोळे जिजाऊ अनाथ आश्रमास शिवसेनेची मदत


             सोमवार दिनांक ०१/०६/२०२० रोजी कोळे ता. कराड येथील जिजाऊ बहुउद्देशीय सेवा संस्था मर्यादित ३० मुलांना शिवसेनेने दिला मदतीचा हात.


              कोरोना संकटामुळे सारं जग मेटाकुटीला आले आहे. २२मार्च पासून लॉकडाऊन असल्यामुळे संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था उन्मळून पडली आहे. हातावर पोट असणार्यांचे हाल होत आहेत. अशावेळी जिजाऊ आश्रम शाळेतील ३० मुलांचेही हाल होत होते. म्हणून संचालक नदाफ सरांशी चर्चा करून नक्की कोणत्या गोष्टी हव्या आहेत हे जाणून घेतले. व दैनंदिन जिवनावश्यक वस्तू जसे की तेल, कपड्याचा, आंगाचा साबण, टुथपेस्ट, डाळी, कडधान्ये इत्यादी वस्तू आश्रमास दिल्या. 


                यावेळी भारतीय मराठा संघाचे संस्थापक अध्यक्ष मा. अविनाश दादा पवार, जनसहकार निधी लि. तळमावळे, मा. मारूती मोळावडे, जनशक्ती कामगार सेना जिल्हाध्यक्ष-महेश लोहार, युवासेना शिवसेना उपशाखाप्रमुख दिपक देसाई, डॉ. वर्षा तावडे, सुनिल पवार, अंकुश पाटील, ओमकार शिंदे, वसंत लोकरे, शांताराम मोरे, इ. कुठरे पंचक्रोशीतील शिवसैनिक उपस्थित होते.


             तसेच यावेळी सिंडीकेट मर्चंट सह. सो. लि. तळमावळे चे संस्थापक मा. अनिल शिंदे व सौ. आशा वसंत लोकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आश्रमशाळेतील मुलांसोबत केक कापून तसेच मुलांना खाऊ देऊन आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.


Popular posts
बंडखोरांना इशारा ते राजीनाम्याची तयारी... उद्धव ठाकरेंच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे
इमेज
वा..वा..वा...प्रत्यक्षात भेटू त्यावेळी काढू फोटो... प्रवीणजी तरडे यांनी दिली स्वतःच्या चित्राला दाद
इमेज
कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स च्या विद्यार्थ्यांचे दहावी बोर्ड परीक्षेमध्ये घवघवीत यश
इमेज
ज्ञानाची शिदोरी’ उपक्रमात सहभागी होण्याचे ‘स्पंदन’ ट्रस्ट चे आवाहन
इमेज
काजारवाडी येथील वि.का.स. सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी सुभाष काजारी तर व्हा. चेअरमन पदी हणमंत जंगम यांची बिनविरोध निवड.
इमेज