रमेश मोरे युवा मंच ची "मदत नव्हे कर्तव्य" या भावनेतून सामाजिक बांधिलकी.


चिखलेवाडी कुंभारगाव येथे आर्सेनिक अल्बम 30 गोळ्यांचे वाटप.


कुंभारगाव दि.


 रमेश मोरे युवा मंच ची "मदत नव्हे कर्तव्य" या भावनेतून सामाजिक बांधिलकी.


पाटण तालुक्यातील ग्रामपंचायत चिखलवाडी कुंभारगाव येथे पाटण पंचायत समितीचे माजी उपसभापती रमेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांना आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचे घरोघरी जाऊन वाटप करण्यात आले. कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व लोकांची प्रतिकारशक्ती वाढण्याच्या दृष्टीने या गोळ्या अतिशय उपयुक्त आहेत. त्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून चिखलेवाडीत या युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन या गोळ्यांचे वाटप केले व या गोळ्या कशा पद्धतीने खायच्या याचे मार्गदर्शन ग्रामस्थांना केले. या गोळ्यांचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत त्यामुळे लहान मुलांपासून वृद्ध व्यक्ती पर्यंत सर्वांना या गोळ्या चालतात. या गोळ्यांचे महत्व ग्रामस्थांना घरोघरी जाऊन पटवून दिले


केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने या गोळ्याची सर्व राज्यांना शिफारस देखील केली आहे.


चिखलेवाडीतील सर्व ग्रामस्थांनी या युवा मंचच्या कार्यकर्त्यांचे व माजी उपसभापती रमेश मोरे यांचे या सहकार्या निमित्त आभार मानले.Popular posts
बंडखोरांना इशारा ते राजीनाम्याची तयारी... उद्धव ठाकरेंच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे
इमेज
वा..वा..वा...प्रत्यक्षात भेटू त्यावेळी काढू फोटो... प्रवीणजी तरडे यांनी दिली स्वतःच्या चित्राला दाद
इमेज
कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स च्या विद्यार्थ्यांचे दहावी बोर्ड परीक्षेमध्ये घवघवीत यश
इमेज
ज्ञानाची शिदोरी’ उपक्रमात सहभागी होण्याचे ‘स्पंदन’ ट्रस्ट चे आवाहन
इमेज
काजारवाडी येथील वि.का.स. सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी सुभाष काजारी तर व्हा. चेअरमन पदी हणमंत जंगम यांची बिनविरोध निवड.
इमेज