सातारा जिल्ह्यात कोरणा मुक्तीची डबल सेंच्युरी.


आज दिवसभरात 40 रुग्णांना सोडले घरी, आज पर्यंत 200 जण झाले कोरोना मुक्त


सातारा दि. 1 ( जि. मा. का ): क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण सरुग्णालय, सातारा येथे दाखल असणारे 5, सह्याद्री हॉस्पिटल येथील 5, कोविड सेंटर रायगांव येथील 2 व खावली येथील 4, पार्ले ता. कराड येथील कोरोना केअर सेंटर येथील 5 असे एकूण 21 कोरोना बाधित रुग्ण आज पूर्णपणे बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथून आज 19 जणांना घरी सोडण्यात आले होते. त्यामुळे आज दिवसभरात एकूण 40 कोरोना बाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, आज पर्यंत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या 200 झाली असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी सांगितले.