यशराज' यांची देसाई कारखान्यात दमदार छाप' प्रशासनामध्ये चैतन्य


यशराज' यांची देसाई कारखान्यात दमदार छाप' प्रशासनामध्ये चैतन्य


दौलतनगर:- राज्याचे गृह आणि अर्थ राज्यमंत्री ना.शंभुराज देसाई यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचेच उच्चशिक्षित सुपुत्र आणि यशस्वी अभियंता युवा नेते यशराज देसाई यांनी तालुक्याच्या राजकारणाबरोबर आता देसाई कारखान्यात ही पदार्पण करून आपल्या कामाची यशस्वी छाप टाकली आहे.गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी कारखान्यात जातीने व बारकाईने लक्ष केंद्रित करून आवश्यक ते प्रशासकीय आणि तांत्रिक बदल करून कारखान्याच्या कारभारात नवे चैतन्य निर्माण केले आहे. त्यामुळे मंत्री देसाई यांच्याच राजकीय मुशीत तयार झालेले आणि युवकांचा आयडॉल असलेले 'यशराज' यांच्या या नव्या एंट्रीने आता साखर कारखान्यातील कारभारही अधिकच गोड होत असल्याची चर्चा सध्या देसाई साखर कारखान्याच्या प्रशासकीय वर्गातून व्यक्त होत आहे.


             मंत्री शंभूराज देसाई यांची १९८६ साली आपले शैक्षणिक जीवन अर्धवट सोडून वयाच्या १९ व्या वर्षीच पाटण च्या राजकारणात एंट्री झाली.मंत्री देसाई यांची कमी वय असतानाही त्यांच्या कामाची जशी पद्धत होती,जो जोश,अभ्यासू वृत्ती आणि जी आक्रमकता होती अगदी तशीच पद्धत पुन्हा ३० वर्षानंतर आमदार देसाई यांचेच सुपुत्र यशराज देसाई यांच्या कामांतून दिसून येत आहे. महाविद्यालयीन अभियांत्रिकी शिक्षण चालू असतानाच त्यांनी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत वयाच्या अवघ्या २० व्या वर्षीच पाटणच्या राजकारणात प्रचाराच्या निमित्तानें एंट्री करून आपल्या कामाची पद्धत,जोश ,आक्रमकता आणि अभ्यासू वृत्ती दाखवून दिली. वैशिष्ठ्य म्हणजे मंत्री 'शंभूराज' आणि 'यशराज 'या वडील मुलाच्या राजकीय कार्यात हुबेहूब साम्य असल्याची चर्चा पाटण तालुक्यात सुरु झाल्या आणि 'यशराज' पाटण मतदारसंघातील तरुणाईचे आयडॉल बनले.यशराज यांनी आपल्या वडीलांसारखेच अभ्यासू आणि श्रवणीय परंतु उपस्थितांची ,आणि जनतेची मने जिंकणारी आकर्षक भाषणे करून मतदारांमध्ये आपली नवी क्रेझ निर्माण केली.


              आता सहा महिन्यांपूर्वी झालेल्या विधान सभेच्या निवडणुकीत पाटण मतदारसंघातून आमदार म्हणून शंभुराज देसाई तिसऱ्यांदा निवडून आले आणि राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार मध्ये गृह ,अर्थ ,उत्पादन शुल्क अशा एकूण महत्वाच्या पाच राज्यमंत्री खात्यांची जबाबदारी देण्यात आली.परिणामी मंत्री देसाई हे राज्याच्या कामांत व्यस्त झाले.त्यामुळे मंत्री देसाई यांच्या मतदारसंघाला हातभार लावण्यासाठी लोकाग्रहास्तव 'यशराज' यांना पुन्हा मतदारसंघात एन्ट्री घ्यावी लागली.गेल्या सहा महिन्यांपासून ते साखर कारखान्याची धुरा यशस्वीपणे सांभाळताना दिसत आहेत.त्यासाठी ते दररोज सातारा ते कारखाना येऊन कारखान्याच्या प्रत्येक विभागाची प्रत्यक्ष स्पॉट वर जाऊन माहिती घेत आहेत. संबंधित विभागाकडे असलेल्या कामांचा सविस्तर आणि अभ्यासपूर्वक आढावा घेऊन आवश्यक ते बदल,करण्यासाठी जाग्यावर निर्णय घेताना दिसत आहेत.एवढेच नव्हे तर कारखान्याची आर्थिक स्थिती,कामगारांचे प्रश्न,कारखान्याचे अधिक उत्पन्न वाढीसाठी लागणारी अत्याधुनिक साधनसामुग्री यासाठी प्रशासनाला करावया लागणारी कार्यवाही या संदर्भात ते स्वतः निर्णय घेताना दिसत आहेत.'यशराज' यांची काम करण्याची नियोजनबद्ध अभ्यासपूर्वक 'शैली' मुळे मंत्री शंभुराज देसाई यांच्याच कार्यशैलीचा हुबेहूब अनुभव येत असल्याने दादांनी घेतलेले निर्णय नेहमीच संस्थेच्या आणि कामगारांच्या भल्याचेच ठरत असल्याने कारखान्याचा कामगार वर्ग आणि प्रशासन वर्ग बेहद्द खुश व समाधानी दिसत आहेत.


          जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत 'यशराज' यांनी आपल्या 'पहिल्याच इनिंग' मध्ये एखाद्या मुरलेल्या राजकीय नेत्याला ही लाजवेल असे काम करून पाटण मतदार संघावर आपल्या कार्याची भुरळ पाडली असतानाच आता केवळ सहा महिन्यात साखर कारखान्याचे आदर्श नियोजन व कारभार करून राजकारणातील आपली 'दुसरी इनिंग' ही यशस्वीपणे पेलत असल्याचे सिद्ध केले आहे.त्यामुळे ज्यांच्या अभियांत्रिक संशोधनाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली अशा हुशार तरुण अभियंता आणि 'मंत्रीपुत्राच्या' अंगी असलेल्या राजकीय यशस्वी संघटन कौशल्याची चर्चा सध्या संपूर्ण जिल्ह्यात होताना दिसत आहे. 


 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


कारखाना व बँकेच्या उमेदवारांचे घेतले इंटरव्ह्यू ...!


लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना आणि शिवदौलत सहकारी बँके मध्ये विविध पदांच्या भरतीसाठी अनेक उमेदवारांनी नुकताच इंटरव्ह्यू दिला. ते सर्व इंटरव्ह्यू राज्याचे मंत्री आणि आपले पिताश्री ना शंभुराज देसाई यांच्या मार्गदशनखाली स्वतः 'यशराज' यांनी दिवसभर विश्रांती न घेता कारखानास्थळी थांबून पूर्ण केले.त्यामुळे 'यशराज दादा' यांच्या अभ्यासपूर्वक इंटरव्ह्यू मधून होणाऱ्या या सर्व नवीन नियुक्त्या गुणवत्तेवरच होणार अशी चर्चा ही पाटण मतदारसंघात उमटत आहेत.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖