संजयकुमार कोटेचा इंडियन रिपोर्टर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्ष पदी निवड
सांगली येथील प्रथितयश मिडीया आणि न्युज पेपर कॅन्सलटंट संजयकुमार कोटेचा यांची नवी दिल्ली येथील इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन च्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन ही भारत सरकारच्या मान्यतेने काम करणारी, संपूर्ण भारतातील सर्वात मोठा पत्रकार परिवार असलेली संस्था असून पत्रकारांसाठी काम करणारी विश्वसनीय संस्था असा या संस्थेचा नावलौकिक आहे. अशा या संस्थेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पदी संजयकुमार कोटे चा यांची निवड करण्यात आली आहे.
याबाबतचे निवडीचे पत्र आणि ओळख पत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले.
विशेष म्हणजे यापूर्वी त्यांची दिल्लीच्या अँटी क्राईम ओरगनायझेशन च्या महाराष्ट्र राज्य जनरल सेक्रेटरी पदीही निवड करण्यात आली आहे.
संजयकुमार कोटेचा हे गेल्या 22 वर्षांपासून वृत्त पत्राच्या नोंदणी पासून छपाई पर्यंतच्या हरेक कामात सल्ला आणि मार्गदर्शन देण्याचे काम करीत असून ते संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहेत. आज पर्यंत त्यांनी 10 हजार 700 वृत्त पत्रांची नोंदणी करण्याचे उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन या संस्थेने त्यांची महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.