कुठरे कोरोना योध्यांना शिवसेनेचा मदतीचा हात.


कुठरे कोरोना योध्यांना शिवसेनेचा मदतीचा हात.            


कुठरे ता. पाटण येथील पंचक्रोशीतील कोरोना योध्दा" म्हणून घरोघरी जाऊन जिवाची पर्वा न करता कोरोना विरुद्ध लढाईत अहोरात्र काम करणार्‍या विभागातील आशाताई, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, व ग्रामपंचायत ऑपरेटर्स यांना शिवसेनेच्या वतीने दिला मदतीचा हात.


               कुठरे ग्रामपंचायत मधील ह्या सर्व महिला कोरोना योध्दा म्हणून गेली दोन ते अडिच महिने कुठरे गाव व वाड्या वस्त्यांवर जाऊन कोरोना संकटाची माहिती देत आहेत. मुंबई पुण्यावरून गावी आलेल्या नागरिकांची स्वतःचा जीव धोक्यात घालून वेळोवेळी तपासणी करत आहेत. अशावेळी सर्व भगिनींना पाठबळ, प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी तसेच त्यांच्या कार्यास सलाम करण्यासाठी कुठरे ग्रामपंचायत मधील भाऊ म्हणून शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक यांनी जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप केले.


            यावेळी भारतीय मराठा संघ संस्थापक अध्यक्ष . अविनाश दादा पवार, सिंडीकेट मर्चंट सह. सो. लि. तळमावले या संस्थेचे संस्थापक अनिल शिंदे , जनसहकार निधी लि. तळमावले संस्थापक मारुती मोळावडे , जनशक्ती कामगार सेना जिल्हाध्यक्ष महेश लोहार. उपशाखाप्रमुख युवासेना चेंबुर दीपक देसाई, केरला आयुर्वेद पंचकर्म ठाणे येथील डॉ वर्षा लोकरे, शिवसैनिक- संजय नलवडे, अंकुश पाटील, आशा लोकरे, ओमकार शिंदे, 


विशेष कार्यकारी अधिकारी सुनील पवार, 


कुठरे गाव पोलीस पाटील विशाल कांबळे उपस्थित होते.


Popular posts
ना. शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या ढेबेवाडी, कुंभारगाव व काढणे विभागातील विविध विकास कामाचे भूमिपूजन संपन्न.
इमेज
'रयत'च्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड झाल्या बद्दल सारंग पाटील यांचा 'जनसहकार'च्या वतीने सत्कार.
इमेज
आधार फाऊंडेशनच्या वतीने ड्रायव्हर दिन साजरा.
इमेज
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर निवड झाल्याबद्दल खा. श्रीनिवास पाटील यांचा 'जनसहकार' तर्फे सत्कार
इमेज
'उत्तर' कार्याला 'निराधारां'ना भरवला 'मायेचा' घास डाकवे परिवाराने जपले सामाजीक ऋण
इमेज