'स्पंदन’च्या दिवाळी अंक स्पर्धेच्या सन्मानपत्राचे ऑनलाइन वितरण धगधगती मुंबई दिवाळी अंकाला उत्कृष्ट अंकाचा पुरस्कार. 


'स्पंदन’च्या दिवाळी अंक स्पर्धेच्या सन्मानपत्राचे ऑनलाइन वितरण धगधगती मुंबई दिवाळी अंकाला उत्कृष्ट अंकाचा पुरस्कार. 


मुंबई - पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने दिवाळी अंक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या स्पर्धेतील उत्कृष्ट दिवाळी अंकांना ऑनलाइन सन्मानपत्रांचे वितरण करण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रातून या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला. यंदा या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे.


     संयोजक डाॅ.संदीप डाकवे म्हणाले, की या वर्षी कोरोनामुळे सदर कार्यक्रम करता येणार नसल्यामुळे सहभागी दिवाळी अंकांना प्रोत्साहन देण्यासाठी ई प्रमाणपत्र पाठवण्यात आले आहे. सदर अंकांमध्ये दै.सकाळ, दै.तरुण भारत बेळगांव, दै.लोकमत, दै.प्रभात, दै.मुक्तागिरी, दै.पुण्यनगरी या दैनिकांनी आपला सहभाग नोंदवला आहे. त्यांचाही सन्मान करण्यात आला.


      याबरोबरच धगधगती मुंबई, सहयाद्री दर्शन, गुंफण, कृष्णातीर, देवाभिमान, कुबेर याही दिवाळी अंकांना उत्कृष्ट दिवाळी अंकाचे सन्मानपत्र देवून गौरवण्यात आले.


स्पर्धेसाठी आलेल्या दिवाळी अंकामधून एक दिवाळी अंक ट्रस्टने संग्रही ठेवला आहे. तर उरलेले दोन दिवाळी अंक विविध ग्रंथालयांना दिले आहेत.


     सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रम नेहमी राबवत असलेल्या स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने साहित्यिक चळवळीला बळकटी देण्यासाठी हा उपक्रम राबवला असल्याचे मत ट्रस्ट चे संस्थापक/अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे यांनी सांगितले आहे.