स्वामी विवेकानंद विचार मंच सेवा संस्थेचे ची सामाजिक बांधिलकी.


 उधवणे तालुका पाटण येथील गरीब व गरजूंना जीवनावश्यक वस्तूंची मदत करताना स्वामी विवेकानंद विचार मंचचे कार्यकर्ते. 


 


ढेबेवाडी दि. सणबुर तालुका पाटण येथील मुंबईस्थित युवकांनी समाजसेवेचे कार्य करण्याच्यादृष्टीने, संकटकाळी समाजातील गरजूंना मदत व्हावी या सामाजिक बांधिलकीतून एकत्र येऊन स्वामी विवेकानंद विचार मंच सेवा संस्था मुंबई या नावाने सेवा संस्था स्थापन केली.


सध्या राज्यावर कोरोनाचे महाभयानक संकट आहे. लॉकडाऊन च्या या काळात अनेक गरीब लोकांना रोजगार उपलब्ध नसल्याने त्यांना अनेक अडचणीतून जीवन जगावे लागत आहे. अशा गरीब गरजू व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंची मदत या संस्थेकडून करण्यात आली आहे. उधवणे तालुका पाटण येथील गरीब व गरजू व्यक्तींना या स्वामी विवेकानंद विचार मंचच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले., सोशल डिस्टन्स चे पालन करून व कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील सर्व प्रशासकीय नियम पाळून गरजूंना ही मदत करण्यात आली.


ज्या गरजू, गरीब लोकांना अशा संकट समयी मोलाची मदत मिळाली म्हणून या लोकांनी या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.