"तीही एक आईच होती......!!"


 


"तीही एक आईच होती......!!"


 


नेहमीच्या शिरस्त्याने सोशल मीडियावर चकरा मारणं सुरू होत.आजच्या "निसर्ग चक्रीवादळ"काय म्हणतंय?की करतंय हे माझ्या डोक्यात घोंगावत होत,त्याची निर्मिती, परिणाम वगैरे सारा भूगोल, पर्यावरण मी पाहून घेतला होता,कित्येक दिवस फक्त"कोरोना"च मानगुटीवर बसलेले भूत नी त्याची आकडेवारी आज पाहण्याची इच्छा सुध्दा झाली नाही.


        तोवर एका पोस्टने माझे लक्ष वेधून घेतले (जी की फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम,टेलिग्राम ह्या सगळ्या माध्यमावर आज ट्रेंड मध्ये होती आणि ती अजिबात सुखावह नव्हती हे देखील खेदाने नमूद करावेसे वाटते.)एका आईची व्यथा होती......हो प्राणी,पक्षी, कीटक असो की मानवप्राणी असो, आई ती शेवटी आईच असते.


       "देवभूमी "म्हणून गवगवा असणाऱ्या" केरळ" राज्यातील "पल्लकड "जिल्ह्यातील"वेल्लीयार"नदीत,स्तब्धपणे ,समाधिस्थ अवस्थेत उभ्या असणाऱ्या गर्भवती हत्तीणीचा फोटो नि सोबत त्यामागची करुण अन तेवढीच हृदयद्रावक कहाणी,२७मे२०२० रोजी केरळच्या" मोहन कृष्णन"यांनी #"माफ कर बहिणी"#अशी ती पोस्ट होती.सायलेंट व्हॅली मधून भुकेने व्याकूळ होऊन ती हत्तीण पल्लकड जिल्ह्यात फिरत होती,तिला खाऊ घालण्यात आलेल्या अननसात फटाके भरलेले होते,ह्याची तिला कसलीतरी कल्पना असू शकणार होती???.......!!....अन असली विकृत" कल्पनाविष्कार"करणाऱ्याला" माणूस"म्हणणे म्हणजे स्वतः माणूस म्हणून लाज आणणारे वाटते...!!


         विशेष म्हणजे निसर्ग अन पर्यावरणाचा मी जो थोडाफार अभ्यास केला आहे किंवा मला चर्चेतून,वाचनातून जी माहिती मिळते त्यात कुठलाही कीटक,पक्षी वा प्राणी स्वतःहून कधीच कोणावरही हल्ला करत नाही की दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेत नाही की,जबरदस्ती करत नाही, असते फक्त जीव साखळीतले अवलंबित्व......!!पण"माणूस"मात्र ह्याला अपवाद आहे बर का...!!एकतर "माणूस"प्राणी सार काही ओरबाडून, निर्विकार बनून घेत असतो नि त्याला त्याच कधीच काही वावगं वाटत नाही हे इतिहास,भूत,वर्तमान,भविष्य स्वच्छपणे सांगत असतो.....!!ह्याला काय म्हणावे?एक माणूस प्राणी म्हणून मलाही ह्याच उत्तर सापडत नाही हेही दुर्दैवाने नमूद करावं लागतं...!!


        एव्हढं होऊनही ती हत्तीण कोणालाही इजा न करता,सरळ नदीच्या मध्यभागी जाऊन शांत,निश्चल बनून उभी राहते अगदी गतप्राण होईपर्यंत....!!


    आपल्या गर्भातील बाळाला सांगत उभी होती का ती?की,बाळा,"बर झालं तू जन्मास आला नाहीस,या" मानव"नावाच्या जगात....!!मीही त्यांच्यावर विश्वास ठेऊन त्यांनी खाऊ घातलेले खायचं धाडस केलं होतं, फक्त तुझ्यासाठी बाळा....!!तुला वाचवण्यासाठी मी अखंडपणे धडपडत होते....!!पण घात झाला होता बाळा.....माझ्यातील"मानवप्राण्यावरील विश्वासाचा,चांगुलपणाचा....,दयावान, भूतदया,प्राणिदया.... असण्याबद्द्लचा....!!


       मग मी ठरवलं तुला नाही ह्या किळसवाण्या,क्रूर, पाशवी,निर्दयी माणूस नावाच्या प्राण्याच्या जगात येऊ द्यायचं....नि पुन्हा मला वाचवण्यासाठी खोटा, मुखवटाधारी आटापिटा करण्यात मग्न असणाऱ्या माणूस प्राण्याच्या मदतीच्या भूलथापांना बळी पडून आत्मघात करण्याचं.....!!नि मी तुझ्यासहित" जलसमाधी"घेण्याचं कठोर पाऊल उचललं..... मला माहीत आहे, तुला हे आवडलं नसणार पण मला तोच योग्य मार्ग वाटला..... कारण कस असतं ना बाळा,"माणूस प्राणी"कधीच नाही चांगला वागू शकत हे मी जाणलं होत नी मनात पक्क केलं होतं.....माझा "त्या"मानवप्राण्यावर असलेला आंधळा विश्वास,तुही ठेवशील नि माझ्यापेक्षा भयंकर आत्मघाताला, तुही बळी पडणार नाही कशावरून??म्हणून मी ह्या जगाचा निरोप घेण्याचं ठरवलं....शांतपणे....!!काहीच प्रतिक्रिया न देता....तुझं माझ्या उदरात असणं.... घेऊन....!!


 


☺️©️✒️शुभा(कंदी पेढा)