घाटमाथा पाटण ते कराड रस्त्याचे उर्वरित काम तातडीने करा. नामदार शंभूराज देसाईंच्या अधिका-यांना बैठकीत सुचना.


दौलतनगर दि.10 :- कराड ते चिपळूण या राष्ट्रीय महामार्गावरील कराड ते पाटणच्या पुढील भागात राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु करण्यात आले असून लवकरच पावसाळा सुरु होणार असल्याने या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत राहण्याचेदृष्टीने कराड ते चिपळूण या राष्ट्रीय महागार्वावरील घाटमाथा,पाटण ते कराड दरम्यानच्या रस्त्याचे काम एल.ॲन्ड टी कंपनीने आणि काम करुन घेणा-या राष्ट्रीय महामार्गाच्या अधिका-यांनी तातडीने करा,अशा सुचना गृह राज्यमंत्री नामदार शंभूराज देसाईंनी राष्ट्रीय महामार्गाच्या व एल.ॲन्ड टी कंपनीच्या अधिका-यांना बैठकीत दिल्या आहेत.


          पाटण येथील तहसिल कार्यालयात कराड ते चिपळूण या राष्ट्रीय महामार्गावरील घाटमाथा पाटण ते कराड या दरम्यानच्या रस्त्याचे कामासंदर्भात नामदार शंभूराज देसाई यांचे उपस्थितीत आढावा बैठक आयोजीत करण्यात आली होती.या बैठकीत पाटणचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार समिर यादव,राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता एस. व्ही. सागांवकर, कनिष्ठ अभियंता एम. एम. फडतरे,गटविकास अधिकारी मिना साळूंखे,उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात,उपवनसंरक्षक विलास काळे,भूमिअभिलेखचे ग.रा.त्रिभुणे,जोंधळेकर,पाटण नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी अभिषेख परदेशी,एल अँड टी कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर घोष, विठ्ठल सावंत, एस.एस.पोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अजित पाटील यांच्यासह एल.ॲन्ड टी कंपनीचे सर्व प्रमुख अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.


        कराड ते चिपळूण या राष्ट्रीय महामार्गाचे कामासंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीमध्ये नामदार शंभूराज देसाई म्हणाले की,पाटण विधानसभा मतदारसंघात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय,राष्ट्रीय महामार्ग विकास योजनेतंर्गत घाटमाथा हेळवाक-पाटण ते कराड या राष्ट्रीय महामार्गाचे काम मंजुर करण्यात आले असून अडीच वर्षापुर्वी या राष्ट्रीय महामार्गाच्या कामास एल अँन्ड टी कंपनीने सुरुवात केली असून सदर कंपनीने घाटमाथा पाटण ते कराड रस्त्यावर ठिक-ठिकाणी रस्त्याची पुर्णत: खुदाई केली असून रस्त्याचे काम अजूनही संथगतीने सुरु आहे. रस्त्याची खुदाई करण्यात आल्याने मोठया प्रमाणात मतदारसंघातील नागरिकांना तसेच वाहनधारकांना दररोज अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.सदरचे काम लवकरात लवकर पुर्ण करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्गाचे अधिक्षक अभियंता,कार्यकारी अभियंता तसेच संबधित एल अँन्ड टी कंपनीचे जनरल मॅनेजर व प्रोजेक्ट मॅनेजर यांच्या संयुक्त बैठकाही घेण्यात आल्या असून त्या-त्या वेळी कराड ते पाटण दरम्याच्या रस्त्याचे काम पुर्ण करण्याच्या सुचनाही दिल्या आहेत. पाटण मतदारसंघाला जोडणारा हा मुख्य रस्ता दिलेल्या मुदतीत या रस्त्याचे काम पुर्ण झाले नसल्याचे त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत पुढे म्हंटले आहे की, लवकरच पावसाळा सुरु होत असल्याने दोन दिवसात रस्त्याचे काम सुरु केले नाही तर राष्ट्रीय महार्गाचे काम पाहणाऱ्या संबंधित शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सुचना देत त्यांनी पुढे म्हंटले की, सदर रस्त्याच्या कामाकरीता तातडीने आवश्यक ते कामगार यंत्रणा उपलब्ध करावी.तसेच अतिवृष्टीच्या काळात रस्त्यावर ठिक-ठिकाणी मोठया प्रमाणांत पाणी साठणे तसेच खुदाई केलेल्या रस्त्यावर चिखल झाल्यास लहान मोठे अपघात घडण्याची शक्यता असल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून एल अँड टी कंपनीकडून घाटमाथा,पाटण ते कराड रस्त्यावर खुदाई केलेल्या ठिकाणी रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची पर्यायी यंत्रणा सतर्क ठेवावी जेणेकरुन रस्त्यावर पाणी साठणार नाही तसेच चिखल होणार नाही, याची काळजी घ्यावी. माहे जुन अखेर या रस्त्यावरील उर्वरित गावांचा 3 डी पुर्ण करुन घ्यावा.जेणेकरुन 3 डी पुर्ण झाल्यानंतर तातडीने उर्वरित रस्त्याचे काम पुर्ण करता येईल असे सांगून या रस्त्यावरील खड्डयांचीही दुरुस्ती तातडीने करण्याच्या सुचना राष्ट्रीय महामार्गाच्या व एल.ॲन्ड टी कंपनीच्या अधिका-यांना बैठकीत दिल्या असल्याचेही त्यांनी शेवटी पत्रकांत म्हंटले आहे.