वादळामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा : जिल्हाधिकारी शेखर सिंह


वादळामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा : जिल्हाधिकारी शेखर सिंह


    सातारा दि.3 (जिमाका) : निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करुन त्याचा अहवाल त्वरीत प्रशासनाकडे सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिल्या.


    यामध्ये मनुष्य हानी, जनावरे, घरांचे नुकसान ( कच्ची,पक्की, झोपड्या) तसेच शेती पिकाचे नुकसानीचे पंचनामेही करावेत. संबंधित यंत्रणांनी स्वत: जातीने लक्ष घालून कोणीही नुकसानग्रस्त वंचीत राहणार नाही याची काळजी घेण्याचेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले.