जागतिक स्तरावर डाॅ.संदीप डाकवे यांच्या कर्तृत्वाची नोंद हायरेंज बुक आॅफ वर्ल्ड रेकाॅर्ड कडून सन्मान


जागतिक स्तरावर डाॅ.संदीप डाकवे यांच्या कर्तृत्वाची नोंद


हायरेंज बुक आॅफ वर्ल्ड रेकाॅर्ड कडून सन्मान


वार्ताहर/तळमावले


पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील अष्टपैलू व्यक्तिमत्व डाॅ.संदीप डाकवे यांनी आतापर्यंत विविध क्षेत्रात केलेल्या कर्तृत्वाची दखल हायरेंज बुक आॅफ वल्र्ड रेकाॅर्ड या जागतिक विश्वविक्रमाची नोंद घेणाÚया पुस्तकाने घेतली आहे. डाॅ.संदीप डाकवे हे आतापर्यंत करत असलेल्या कामाचा सन्मान या निमित्ताने झाला आहे. समन्वयक श्री.नितीन गवळी यांनी याबाबतचे सन्मानपत्र संदीप डाकवे यांना नुकतेच दिले आहे.


कोरोना विषाणूच्या संकटामुळे निर्माण झालेल्या लाॅकडाऊनच्या काळात पोलीसांना मास्क वाटप, कोरोना वाॅरियर्सना कृतज्ञता सन्मानपत्र, संस्था, व्यक्ती यांना डिजिटल ई सन्मानपत्र, मुख्यमंत्री सहायता निधी कोविड-19 मध्ये मदत इ. उल्लेखीय कार्य डाॅ.डाकवे यांनी केले आहेत. याची विशेष दखल या सन्मानपत्रात घेतली आहे.


हायरेंज बुक आॅफ वर्ल्ड रेकाॅर्ड या पुस्तकाने दखल घेतल्यामुळे संदीप डाकवे यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.


डाकेवाडीसारख्या दुर्गम, डोंगराळ भागातून डाॅ.संदीप डाकवे यांनी कला, पत्रकारिता व स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक इ.क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची वेगळी छाप उमटवली आहे. शब्दचित्रे, व्यंगचित्रे, कॅलिग्राफी, पेपर कटींग आर्ट, मोरपीस-जाळीदार पिंपळपानावर कलाकृती, रांगोळी इ. कलेची विविध माध्यमे त्यांनी हाताळली आहेत. या कलाकृतींची प्रदर्शने देखील भरवली आहेत. विविधांगी विषयावर हस्तलिखिते, भित्तीपत्रिका करण्यात त्यांचा हातखंडा आहे. शासकीय योजनांवर स्वतः लिहलेल्या लेखमालांच्या कात्रणांचे प्रदर्शनही त्यांनी वेळोवेळी भरवले आहे. अनेक पुस्तकांची मुखपृष्ठे त्यांच्या संकल्पनेतून साकरली आहेत. शिवाय काॅलेज जीवनात ‘झेप’ या नियकालिकाच्या मुखपृष्ठावरही त्यांचा फोटो झळकला होता. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचेकडून त्यांच्या कथेला पारितोषिक मिळाले आहे. याशिवाय ‘पोएट्री माईल स्टोन’ या विश्वविक्रमी काव्यसंग्रहात त्यांच्या कवितेची निवड झाली आहे. आजच्या सोशल मिडीयाच्या काळात ‘पत्रातून मैत्री’ हाही छंद त्यांनी मोठया कौशल्यपूर्वक जपला आहे.


डाॅ.डाकवे हे एक तपाहून अधिक काळ पत्रकारिता क्षेत्रात काम करत असून त्यांची ‘मनातलं’, ‘जलयुक्त शिवार अभियान’ ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तर ‘समाज स्पंदनाची पत्रे’, ‘सेलिब्रिटी कट्टा’, ‘मुक्काम पोस्ट डाकेवाडी’, ‘अक्षर शुभेच्छा’ ही पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून लोकसहभागातून अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले आहेत. रु.75,000/- ची रोख आर्थिक मदत केली आहे. शिवाय 1 लाखाहून जास्त किमतीचे शालेय साहित्याचे वाटप केले आहे. याशिवाय महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणूनही नियुक्ती झाली आहे.


विविध नियतकालिक, वर्तमानपत्रे, साप्ताहिक, मासिक, दिवाळी अंक यामधून डाॅ.संदीप डाकवे यांच्या बातम्या, मुलाखती प्रसिध्द झाल्या आहेत. टीव्ही 9 मराठी, झी 24 तास, स्थानिक केबल चॅनेल, यू टयूब चॅनेल, वेब पोर्टल यांनीदेखील त्यांच्या कामाची दखल घेतली आहे.


डाॅ.संदीप डाकवे यांच्या या कलेची, सामाजिक क्षेत्रातील कर्तृत्वाची नोंद हायरेंज बुक आॅफ वल्र्ड रेकाॅर्ड मध्ये नोंद झाल्यामुळे विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.


 


दृष्टीक्षेपात डाॅ.संदीप डाकवे यांची ओळख:


महाराष्ट्र राज्य शासनाचा 4 वेळा पुरस्कार


इंडिया बुक आॅफ रेकाॅर्ड मध्ये दोनदा नोंद


3000 पेक्षा जास्त सेलिब्रिटींना चित्रांची भेट


आतापर्यंत सुमारे 36 पुरस्कारांनी सन्मानित


‘खसखस’ या वेब पेज कडून विशेष दखल


विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुक


सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर