कृष्णा हॉस्पिटलमधून 8 कोरोनामुक्त रूग्णांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज


 


कृष्णा हॉस्पिटलमधून 8 कोरोनामुक्त रूग्णांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज


कराड, ता. 10 : सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यातील एकूण 8 कोरोनामुक्त रूग्णांना आज कृष्णा हॉस्पिटलमधून टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमधून एकूण 170 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 


 


कराड तालुक्यातील नांदगाव येथील 67 वर्षीय पुरूष, कुंभारगाव-पाटण येथील 70 वर्षीय पुरूष, दहिवडी-माण येथील 50 वर्षीय पुरूष, 58 वर्षीय पुरूष, गलमेवाडी-पाटण येथील 24 वर्षीय महिला, धामणी येथील 31 वर्षीय पुरूष, गावडेवाडी येथील 27 वर्षीय पुरूष, दाह्यात-वाई येथील 53 वर्षीय पुरूष हे रूग्ण गेले काही दिवस कृष्णा हॉस्पिटलच्या कोरोना विशेष वार्डमध्ये उपचार घेत होते. त्यांचे उपचारनंतरचे अहवाल निगेटीव्ह आल्याने आज त्यांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला.



यावेळी सहाय्यक धर्मादाय आयुक्त एस. एल. फुले, निरीक्षक पी. आर. येवले, आर. एच. देवरे, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते कोरोनामुक्त रूग्णांचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. 


 


याप्रसंगी कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे वित्त अधिकारी पी. डी. जॉन, सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, प्राचार्य डॉ. वैशाली मोहिते, डॉ. एस. आर. पाटील, रोहिणी बाबर यांच्यासह हॉस्पिटलचा अन्य स्टाफ उपस्थित होता.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


‘त्या’ बाळंतिणीचीही कोरोनावर यशस्वी मात


कृष्णा हॉस्पिटलच्या कोरोना विशेष वॉर्डमध्ये दाखल झालेल्या गलमेवाडी (ता. पाटण) येथील 24 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह गर्भवती महिलेची 24 मे रोजी शस्त्रक्रियेद्वारे यशस्वी प्रसुती करण्यात आली होती. ही गर्भवती महिला कोरोना पॉझिटिव्ह असली तरी तिच्या नवजात बाळाच्या स्वॅबचा रिपोर्ट मात्र निगेटीव्ह आला होता. कृष्णा हॉस्पिटलमधील यशस्वी उपचाराने कोरोनावर मात केलेल्या या बाळंतिणीला आज टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. तसेच तिचे नवजात बालकही तिच्याकडे आज सुपुर्द करण्यात आले. 


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖