कोविड बाधित 70 वर्षीय पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यु. 


कोविड बाधित 70 वर्षीय पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यु. 


 


106 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह


  सातारा दि. 26 ( जि. मा. का ) : काल रात्री उशीरा प्राप्त रिपोर्टनुसार सह्याद्री हॉस्पिटल, कराड येथे पाटण तालुक्यातील सदा दाढोली येथील 70 वर्षीय कोविड बाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे वाई तालुक्यातील शेंदुरजणे येथील 62 वर्षीय पुरुषाला सारी ची लक्षणे असल्याने काल दाखल करुन नमुना तपासणी करीता पुणे येथे पाठविण्यात आला आहे. त्याचा काल रात्री उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.


106 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह


काल रात्री उशीरा एन.सी.सी.एस, पुणे व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड यांच्याकडून 106 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याचे कळविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.