जिल्ह्यातील 7 नागरिक कोरोना बाधित


जिल्ह्यातील 7 नागरिक कोरोना बाधित


सातारा दि. 15 (जि. मा. का): सातारा जिल्ह्यात विविध रुग्णालयांमध्ये दाखल असणाऱ्या मुंबईहून प्रवास करुन आलेल्या 4 व बाधित रुग्णांचे निकटसहवासित असलेल्या 3 अशा एकूण 7 नागरिकांचे रिपोर्ट कोरोनाबाधित आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.


 


कोरोना बाधित रुग्णांमध्ये सातारा तालुक्यातील गोजेगाव येथील 46 वर्षीय महिला व क्षेत्रमाहूली येथील 50 वर्षीय पुरुष.


 


कोरेगाव तालुक्यातील अनपटवाडी येथील 65 वर्षीय महिला.


खटाव तालुक्यातील बोंबाळे येथील 60 वर्षीय महिला,


खंडाळा तालुक्यातील झगलवाडी येथील 50 वर्षीय पुरुष


माण तालुक्यातील दहिवडी येथील 60 वर्षीय पुरुष व किरकसाल येथील 49 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.


 


जिल्ह्यात एका पुरुषाचा व महिलेचा मृत्यू;


 मृत्यू झालेल्यांसह 160 जणांच्या घशातील नमुने तपासणीसाठी


 


सातारा दि. 15(जि. मा. का): सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात सारीचे रुग्ण म्हणून दाखल असणाऱ्या वारुंजी ता. कराड येथील 50 वर्षीय पुरुषाचा आणि कण्हेर ता. सातारा येथील 61 वर्षीय महिलेचाही मृत्यू झाला असून या दोघांचे घशातील नमूने कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.


 


158 नागरिकांचे घशातील नमुने तपासणीसाठी


क्रांतीसिह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील 19, कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथील 42, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 12, उप जिल्हा रुग्णालय फलटण येथील 3, ग्रामीण रग्णालय, कोरेगाव येथील 7, ग्रामीण रुग्णालय वाई येथील 5, शिरवळ येथील 11, रागगांव येथील 2, पानमळेवाडी येथील 8, मायणी येथील 27, महाबळेश्वर येथील 12, पाटण येथील 3 व दहिवडी येथील 7 अशा एकूण 158 नागरिकांच्या घशातील स्त्रावाचे नमुने कोरोना तपासणीसाठी कृष्णा मेडिकल कॉलेज कराड व एन.सी.सी. एस. पुणे येथे पाठविण्यात आले आहेत.