तुळसणच्या 6 जणांची कोरोनावर मात कृष्णा हॉस्पिटलमधून एकूण 9 जणांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज


तुळसणच्या 6 जणांची कोरोनावर मात


कृष्णा हॉस्पिटलमधून एकूण 9 जणांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज


कराड, ता. 15 : कराड तालुक्यातील तुळसण येथील 6 जणांनी कोरोनावर मात केली आहे. या 6 जणांसह एकूण 9 कोरोनामुक्त रूग्णांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमधून एकूण 194 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 


कराड तालुक्यातील तुळसण येथील 60 वर्षीय महिला, 50 वर्षीय महिला, 26 वर्षीय महिला, 30 वर्षीय पुरूष, 26 वर्षीय पुरूष, 65 वर्षीय महिला, वडगाव-उंब्रज येथील 49 वर्षीय महिला, कोळकी-फलटण येथील 45 वर्षीय महिला व 25 वर्षीय पुरूष हे रूग्ण गेले काही दिवस कृष्णा हॉस्पिटलच्या कोरोना विशेष वार्डमध्ये उपचार घेत होते. त्यांचे उपचारनंतरचे अहवाल निगेटीव्ह आल्याने आज त्यांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. 


या कोरोनामुक्त रूग्णांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख, डॉ. अरूण पाटील, डॉ. अनिल हुद्देदार, डॉ. संजय पाटील, रोहिणी बाबर यांच्यासह हॉस्पिटलचा अन्य स्टाफ उपस्थित होता.