वडगाव उंब्रज येथील दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह; नऊ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह,  आज 6 जण कोरोना मुक्त तर 215 जणांचे नमुने पाठविले तपासणीला


वडगाव उंब्रज येथील दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह; नऊ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह, 


आज 6 जण कोरोना मुक्त तर 215 जणांचे नमुने पाठविले तपासणीला


 


 सातारा दि. 5 (जिमाका) : कराड तालुक्यातील वडगाव उंब्रज येथील 49 वर्षीय महिला व 86 वर्षीय पुरुष असे दोन जणांचा रिपोर्ट कोरोना (कोविड 19) बाधित आहेत. तसेच 9 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.


 6 जणं कोरोनामुक्त 


 कोविड केअर केंद्र खावली ता. सातारा येथील 2 व कोविड केअर केंद्र, रायगाव ता. जावली येथील 4 असे एकूण 6 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


 215 जणांचे नमुने पाठविले तपासणीला 


 क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 68, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 15, ग्रामीण रुग्णालय, वाई येथील 6, ग्रामीण रुग्णालय, खंडाळा येथील 93, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 33 असे एकूण 215 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस, पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशीही माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.


Popular posts
बंडखोरांना इशारा ते राजीनाम्याची तयारी... उद्धव ठाकरेंच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे
इमेज
वा..वा..वा...प्रत्यक्षात भेटू त्यावेळी काढू फोटो... प्रवीणजी तरडे यांनी दिली स्वतःच्या चित्राला दाद
इमेज
कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स च्या विद्यार्थ्यांचे दहावी बोर्ड परीक्षेमध्ये घवघवीत यश
इमेज
ज्ञानाची शिदोरी’ उपक्रमात सहभागी होण्याचे ‘स्पंदन’ ट्रस्ट चे आवाहन
इमेज
काजारवाडी येथील वि.का.स. सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी सुभाष काजारी तर व्हा. चेअरमन पदी हणमंत जंगम यांची बिनविरोध निवड.
इमेज