कृष्णा हॉस्पिटलमधून 5 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज


कृष्णा हॉस्पिटलमधून 5 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज 


 


        कराड दिनांक - कराड तालुक्यातील इंदोली, गोकुळ-पाटण व उंब्रज येथील एकूण 5 कोरोनामुक्त रूग्णांना आज कृष्णा हॉस्पिटलमधून टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमधून एकूण 116 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


         इंदोली येथील 15 वर्षीय मुलगा, गोकुळ-पाटण येथील 2 वर्षीय मुलगा, 36 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय महिला, उंब्रज येथील 58 वर्षीय पुरुष गेले काही दिवस कृष्णा हॉस्पिटलच्या कोरोना विशेष वार्डमध्ये उपचार घेत होते. त्यांचे उपचारनंतरचे अहवाल निगेटीव्ह आल्याने आज त्यांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला.


          यावेळी कृष्णा अभिमत विद्यापीठाच्या सहाय्यक कुलसचिव अर्चना कौलगेकर, दिगंबर कुलकर्णी, अमृता करंबळेकर, राधिका चिवटे, मनीषा मराठे, अजिंक्य भोसले यांच्या हस्ते कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.


         याप्रसंगी कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक ए. वाय. क्षीरसागर, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, डॉ. संजय पाटील, डॉ. व्ही. सी. पाटील, डॉ. एस. आर. पाटील, रोहिणी बाबर यांच्यासह हॉस्पिटलचा अन्य स्टाफ उपस्थित होता.


Popular posts
मंत्री शंभूराज देसाई यांची उद्या दौलतनगर येथे सभा. शक्ती प्रदर्शनाकडे जिल्ह्याचे लक्ष
इमेज
"आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव" पुरस्काराने मान्याचीवाडीचा गौरव ; मान्याचीवाडी ठरले जिल्हयातील स्मार्टग्राम.
इमेज
विनायक मेटे यांचा कार अपघातात अकाली मृत्यू! मराठा आरक्षण आंदोलनाचा आवाज हरपला
इमेज
कुंभारगाव ग्रामपंचायत मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. सरपंच सौ. सारिका पाटणकर यांचे शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न.
इमेज
कुंभारगाव येथे "हर घर तिरंगा "रॅली संपन्न.
इमेज