"स्मगलर एक वल्ली" भाग 3 


"स्मगलर एक वल्ली" भाग 3 


            " स्मगलरच्या पोतडीतून जादूगाराप्रमाणे निघणाऱ्या जिनसा पाहिल्या की एक अजब कुतूहल आम्हा मुलांच्या मनात दाटून यायचं. कसलं भारी न???पिशवी च नो टेन्शन...!! सगळं कसं अंगावरील कपड्यात सामावून जायचं. आता स्मगलरचा मी वेगळ्या दृष्टीने विचार करते...!!"पर्यावरणप्रेमी"होता की तो असे काही-बाही चमत्कारिक विचार माझ्या डोक्यात येतात.नि माझं मलाच हसू येत..!!


             स्मगलरच रोज कॉलनीत येणं , कोणत्याही घरी बिनदिक्कत जाण, त्या घरातील गृहिणीला वा घरधन्याला आपल्या जवळचा माल विकत घेण्यासाठी आर्जव करणं....तो खपवण,कधी-कधी आडमुठ्यासारखं वागून तोंडातल्या तोंडात काही-बाही पुटपुटत पुढच्या घरात जाण ...मिळालेल्या पैश्यातून ,रेल्वे स्टेशनवर जाऊन काहीही खाण नि महत्वाच म्हणजे "देशी "दारू पिण...हे अव्याहतपणे घडत असे.जवळपास आम्ही दहा वर्ष तरी त्याचा हा शिरस्ता पाहत होतो.लहानपणी तो मिळवलेल्या पैशाच काय करत असेल असे प्रश्न पडत नसत, व त्याच उत्तर आता अलीकडे समजलं...!!


             मला मात्र त्याच विशिष्ट विचित्र ओळखू येणारी उंचपुरी देहयष्टी, बोलण्याची लकब , अचानक तऱ्हेवाईक वागणं अजूनही लख्खपणे आठवत...!!फारच अजागळ वागणारा नि, चामड्याची चप्पल घालून,शेतातील काळ्या मातीत लडबडून येऊन ही वल्ली सरळ तशीच चिखलाचा डोंगर घेऊन ,आईने थांब बाबा थांब म्हणेतो घरात आपली" पदचिन्ह" उमटवत स्थानापन्न होत असे,तेव्हा आईने उद्वेगाने स्मगलरला बोललेले शाब्दिक फटकारे तो जणू काहीच घडले नाही...या आविर्भावात ,पिवळे जर्द दात विचकून,अजाण बालकाप्रमाणे बघत राही तेव्हा मला तो साक्षात "तेंडुलकर"वाटायचा बुवा....!!पुढच्या गोलंदाज कोणीही असो,नि कसा ही बॉल टाको,कितीही खिजवत राहो, वेडावत राहो....आपण शांत रहायचं....तसा हा स्मगलर मला वाटायचा..!!


              शेवटी,आईच म्हणायची"आलास बाबा....कंबरड मोडलं माझं आधीच शंभरदा फरशी पुसून,ही पोर माझा जीव काढतात.... त्यात तू आणखी काम वाढवून ठेवलं...!!"झालं म्हणजे... आम्ही पोर सुद्धा पुन्हा आईच्या निशाण्यावर येण्याच्या बेतात असू...!!मग मात्र आम्ही स्मगलरला म्हणत असू,"बाबा..!आम्ही सुद्धा एव्हढा चिखल घरात आणत नाही..पण तुम्ही आणला आम्ही पायपुसणीला पाय पुसून घरात जातो.हे ऐकून स्मगलर आज्ञाधारकपणे "बर पोरांनो पुसतो पाय"असे म्हणून मग त्याच्या चप्पल ला लागलेला काळ्या मातीचा सगळा ढिगारा पायपुसणी ला चोपडत असे नि..आई जगदंबा बनून आमच्याकडे खाऊ की गिळू असे बघत असे."स्मगलरची"ही आज्ञाधारकता आम्हाला नंतर आईच्या प्रसादाच्या रुपात पोटभर मिळत असे.मी मात्र फारच हुशार होते,आईचा चेहरा मोहरा पाहून लागलीच घरातून धूम ठोकत असे...!!


         स्मगलर घरातून जाऊन ,सगळं शांत झाले की मगच मी हळूच चोरपावलांनी घरात येऊन आईचा एकंदरीत नूर पाहून मग लाडीगोडीने तिचा सारा राग दूर करत असे.पण,"स्मगलर"च्या "त्या"आज्ञाधारकपणामुळे मला मात्र बऱ्याच वेळा आईकडून "क्लीन बोल्ड"होण्याची नि घरातून"पी.टी. उषा"सारख जीव खाऊन पळ काढण्याची नामुष्की ओढवत असे...!!


 


........(क्रमशः)


 


✒️शुभांगी पवार (कंदी पेढा)