जिल्ह्यात 28 नागरिकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह,


जिल्ह्यात 28 नागरिकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह,


185 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह


सातारा दि. 27 (जि. मा. का): विविध रुग्णालयांत व कोरोना केअर सेंअर मध्ये उपचार घेत असलेल्या जिल्ह्यातील 28 नागरिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून 185 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.


या कोरोनाबाधित 28 रुग्णांमध्ये 21 पुरुष व 7 महिलांचा समावेश असून यात मुंबई, ठाणे, शाहजहा येथून प्रवास करुन आलेले 6 प्रवासी, 18 निकटसहवासित आणि 4 सारीचे रुग्ण आहेत. 


बाधित रुग्णांमध्ये वाई तालुक्यातील कडेगाव येथील 34 वर्षीय पुरुष, पसरणी येथील 48 वर्षीय पुरुष, अमृतवाडी येथील 50 वर्षीय पुरुष, बावधन येथील 57 वर्षीय पुरुष.,


खटाव तालुक्यातील मायणी येथील 29 वर्षीय पुरुष.,


सातारा तालुक्यातील धावली(रोहोट) येथील 45 वर्षीय महिला, राजापुरी येथील 39 वर्षीय पुरुष, पाटखळ माथा येथील 28 वर्षीय पुरुष.,


खंडाळा तालुक्यातील शिंदे वस्ती (लोणंद) येथील 38 वर्षीय महिला, आसवली येथील 27 वर्षीय पुरुष.,


पाटण तालुक्यातील उरुल येथील 60 वर्षीय पुरुष.,


 


कराड तालुक्यातील तारुख येथील वय 21, 22 वर्षीय युवक तसेच वय 27, 28 व 48 वर्षीय पुरुष आणि वय 45 व 50 वर्षीय महिला, चरेगाव येथील 4 वर्षीय बालक, वय 38 व 36 वर्षीय पुरुष आणि 32 वर्षीय महिला, बनवडी येथील 29 वर्षीय पुरुष, कराड शहरातील शनिवार पेठेतील 75 वर्षीय पुरुष.,


कोरेगाव तालुक्यातील नागझरी येथील 26 वर्षीय पुरुष.,


 


जावळी तालुक्यातील रामवाडी येथील 65 वर्षीय पुरुष व 60 वर्षीय महिला, आखेगनी (रांजणी) येथील 42 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.


Popular posts
बंडखोरांना इशारा ते राजीनाम्याची तयारी... उद्धव ठाकरेंच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे
इमेज
वा..वा..वा...प्रत्यक्षात भेटू त्यावेळी काढू फोटो... प्रवीणजी तरडे यांनी दिली स्वतःच्या चित्राला दाद
इमेज
कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स च्या विद्यार्थ्यांचे दहावी बोर्ड परीक्षेमध्ये घवघवीत यश
इमेज
ज्ञानाची शिदोरी’ उपक्रमात सहभागी होण्याचे ‘स्पंदन’ ट्रस्ट चे आवाहन
इमेज
काजारवाडी येथील वि.का.स. सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी सुभाष काजारी तर व्हा. चेअरमन पदी हणमंत जंगम यांची बिनविरोध निवड.
इमेज