उरुल येथील 26 वर्षीय पुरुषाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह


उरुल येथील 26 वर्षीय पुरुषाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह ;22 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह


29 जणांचा डिस्चार्ज तर 158 जणांचे नमुने पाठविले तपासणीला 


सातारा दि. 11 ( जि. मा. का ) : कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे तपासणी करण्यात आलेल्या 23 नमुन्यांपैकी पाटण तालुक्यातील उरुल येथील 26 वर्षीय पुरुष कोरोना बाधित असल्याचा रिपोर्ट प्राप्त झाला आहे. तसेच 22 जणांचे नमुने निगेटिव्ह आले असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी कळविले आहे.


29 जणांना डिस्चार्ज


क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 4, बेल एअर, पाचगणी येथील 16, कोविड केंअर सेंटर, शिरवळ येथील 3, माण येथील 1, वाई येथील 1, रायगाव येथील 4 असे एकूण 29 जणांना रुग्णालयातून 10 दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.


158 जणांचे नमुने पाठविले तपासणीला 


क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 12, पानमळेवाडी येथील 16, शिरवळ येथील 23, कराड येथील 29, वाई येथील 48, रायगाव येथील 2, मायणी येथील 16, महाबळेश्वर येथील 5, फलटण येथील 7 असे एकूण 158 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असून जिल्हा रुग्णालय, सातारा व एन.सी.सी.एस. पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.