काल शनिवारी कृष्णा हॉस्पिटलमधून 23 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज


कृष्णा हॉस्पिटलमधून 23 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज


कराड, ता. 6 : सातारा जिल्ह्याच्या विविध भागातील एकूण 23 कोरोनामुक्त रूग्णांना काल शनिवारी कृष्णा हॉस्पिटलमधून टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमधून एकूण 144 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 


 


कराड तालुक्यातील म्हासोली येथील 27 वर्षीय महिला, 20 वर्षीय महिला, 71 वर्षीय पुरूष, कलेढोण येथील 45 वर्षीय महिला, सदुर्पेवाडी-सळवे-पाटण येथील 35वर्षीय पुरूष, मोरगिरी-पाटण येथील 72 वर्षीय महिला, दहिवडी-माण येथील 28 वर्षीय महिला, 34 वर्षीय महिला, देगाव-वाई येथील 42 वर्षीय महिला, धामणी येथील 62 वर्षीय महिला, 30 वर्षीय युवक, 35 वर्षीय पुरूष, 36 वर्षीय पुरूष, मालनपूर-चिखली-वाई येथील 24 वर्षीय युवक, सिधांतवाडी-वाई येथील 52 वर्षीय पुरूष, मानेचीवाडी येथील 20 वर्षीय युवक, आढे-पाटण येथील 35 वर्षीय पुरूष, म्हावशी-पाटण येथील 45 वर्षीय पुरूष, कास-खुर्द येथील 44 वर्षीय पुरूष, शामगाव येथील 38 वर्षीय पुरूष, शिराळ-पाटण येथील 52 वर्षीय महिला, तामिनी-पाटण येथील 7 वर्षीय मुलगी, मोरगिरी-पाटण येथील 65 वर्षीय पुरूष हे रूग्ण गेले काही दिवस कृष्णा हॉस्पिटलच्या कोरोना विशेष वार्डमध्ये उपचार घेत होते. त्यांचे उपचारनंतरचे अहवाल निगेटीव्ह आल्याने काल त्यांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला.



यावेळी कराडच्या नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, डॉ. व्ही. सी. पाटील, डॉ. संतोष टकले, डॉ. राहुल फासे, राहुल माळी, अवधूत अवसरे, श्रीनिवास जोशी, विशाल पाटील, इम्रान इनामदार, रश्मी पंढरपुरे, दीपाली धोत्रे, वनिता नावडकर, श्रीपाद खुपसंगीकर, अस्मिता देशपांडे, नंदिनी चव्हाण, महेंद्र आलाटे यांच्या हस्ते कोरोनामुक्त रूग्णांचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. 


 


याप्रसंगी कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक ए. वाय. क्षीरसागर, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, डॉ. संजय पाटील, डॉ. एस. आर. पाटील, रोहिणी बाबर,डॉ. विश्वास पाटील, विक्रम पवार यांच्यासह हॉस्पिटलचा अन्य स्टाफ उपस्थित होता.


Popular posts
उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्रीपदा सोबतच आमदारकीचाही राजीनामा ; बंडखोर आमदारांवर शेवटच्या भाषणातही खेद.
इमेज
एका पानावर लिहला संपूर्ण हरिपाठ
इमेज
बंडखोरांना इशारा ते राजीनाम्याची तयारी... उद्धव ठाकरेंच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे
इमेज
योगेश टोंपे व मीना साळुंखे यांच्या कार्याला पाटणच्या जनतेचा सलाम!
इमेज
गुढे ता.पाटण येथील वि.का.स. सेवा सोसायटी चेअरमन पदी रविंद्र पाटील तर व्हा. चेअरमन पदी शिवाजी माने यांची बिनविरोध निवड.
इमेज