खाजगी हॉस्पिटल मध्ये 23 वर्षीय गरोदर महिला कोरोना बाधित. 9 जणांना दिला रुग्णालयातून डिस्चार्ज


खाजगी हॉस्पिटल मध्ये 23 वर्षीय गरोदर महिला कोरोना बाधित


9 जणांना दिला रुग्णालयातून डिस्चार्ज


35 जणांचे नमुने पाठविले तपासणीला


सातारा दि. 14 ( जि. मा. का ) : सातारा येथील खाजगी रुग्णालयातून खाजगी प्रयोगशाळेत तपासणीकरीता पाठविलेल्या 23 वर्षीय गरोदर महिलेचा नमुना कोरोना बाधित असल्याचे संबंधित रुग्णालयाने कळविले आहे.


 


            मायणी कोविड सेंटर येथील 2, बेल एअर हॉस्पिटल पाचगणी येथील 3, कोविड केअर सेंटर पार्ले येथील 2, कोविड केअर सेंटर म्हसवड येथील 1 व ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथील 1 असे एकूण 9 जणांना दहा दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.


 


            मायणी कोविड सेंटर येथे दाखल असणाऱ्यांमध्ये खटाव तालुक्यातील पाचवड येथील 56 वर्षीय पुरुष, वांझोळी येथील 52 वर्षीय पुरुष.


 


बेल एअर हॉस्पिटल, पाचगणी येथे दाखल असणाऱ्यांमध्ये महाबळेश्वर तालुक्यातील कासवंड गोळेवाडी येथील 36, 62 व 12 वर्षीय महिला.


 


कोविड केअर सेंटर, पार्ले येथे दाखल असणाऱ्यांमध्ये कराड तालुक्यातील वानरवाडी येथील 70 वर्षीय महिला व 17 वर्षीय युवती.


कोविड केअर सेंटर, म्हसवड येथे दाखल असणाऱ्यांमध्ये माण तालुक्यातील दहिवडी येथील 17 वर्षीय पुरुष.


ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथे दाखल असणाऱ्यांमध्ये खटाव तालुक्यातील निढळ येथील 23 वर्षीय महिला.


 


                35 जणांचे नमुने पाठविले तपासणीला


        क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुगणालय, सातारा येथील 16, शिरवळ येथील 13 व पानमळेवाडी येथील 6 असे एकूण 35 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस., पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.


            आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या एकूण 728 झाली असून कोरोनातून 508 बऱ्या झालेल्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. विविध रुग्णालयांमध्ये कोरोनावर उपचार सुरु असणाऱ्यांची संख्या 188 इतकी झाली आहे तर 32 जणांचा मृत्यु झालेला आहे.