आज 21 जणांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह


आज 21 जणांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह


सातारा दि. 16 ( जि. मा. का ) : आज आलेल्या रिपोर्टनुसार कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड व एन. सी. सी. एस. पुणे येथे तपासणी करण्यात आलेल्या 21 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर कळविले आहे.


यामध्ये औरंगाबाद जिल्यातील 21 वर्षीय तरुण 


देहू माळवाडी ता. हवेली जि. पुणे येथील 48 वर्षीय महिला.


कराड तालुक्यातील मालखेड येथील 60 वर्षीय पुरुष, तारुख येथील 50 वर्षीय पुरुष, तुळसण येथील 28 वर्षीय पुरुष, 25 व 53 वर्षीय महिला, 5 वर्षीय बालीका.


वाई तालुक्यातील बावधन (शेलारवाडी) येथील 49 वर्षीय महिला, 25 वर्षीय पुरुष.


कोरेगांव तालुक्यातील पवारवाडी येथील 48 वर्षीय पुरुष, 38 वर्षीय महिला, 21 वर्षीय तरुणी, 17 वर्षीय तरुण.


खटाव तालुक्यातील मायणी येथील 37 वर्षीय पुरुष.


फलटण तालुक्यातील वडले येथील 25 वर्षीय महिला.


जावली तालुकयातील गांजे येथील 48 वर्षीय महिला .


पाटण तालुक्यातील उरुल येथील 31 वर्षीय पुरुष.


 सातारा शाहूनगर येथील 45 वर्षीय महिला, 15 वर्षीय तरुण व वाडेफाटा येथील 67 वर्षीय पुरुष.


आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या एकूण 766 झाली असून कोरोनातून बरे झालेल्या 562 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. विविध रुग्णालयांमध्ये कोरोनावर उपचार सुरु असणाऱ्यांची संख्या 169 इतकी झाली आहे तर 35 जणांचा मृत्यु झालेला आहे.