जिल्ह्यातील 20 नागरिकांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह


जिल्ह्यातील 20 नागरिकांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह


सातारा दि.10 (जिमाका): सातारा जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय येथे अनुमानित म्हणून भरती असलेल्या 20 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.


यामध्ये खंडाळा तालुक्यातील आसवली येथील 25 वर्षीय पुरुष


पाटण तालुक्यातील जांभेकरवाडी येथील 30 वर्षीय पुरुष


महाबळेश्वर येथील 29 वर्षीय महिला


जावली तालुक्यातील भणंग येथील 21 वर्षीय पुरुष व 24 वर्षीय महिला, धोंडेवाडी येथील 63 पुरुष, 57 वर्षीय पुरुष 


सातारा तालुक्यातील पिंपळवाडी धावडशी येथील 15 वर्षीय मुलगी व 12 वर्षीय मुलगा, शाहुपुरी सातारा येथील 58 वर्षीय पुरुष


वाई तालुक्यातील व्याजवाडी येथील 27, 29 वर्षीय पुरुष व 22 वर्षीय महिला, पाचवड येथील 39 वर्षीय महिला व 13 व 16 वर्षाच्या मुली, वेळे येथील 59 वर्षीय पुरुष 


माण तालुक्यातील गोंदवले ब्रुद्रुक येथील 63 वर्षीय महिला


खटाव तालुक्यातील मासूरने येथील 24 वर्षीय पुरुष व गुरसाळे येथील 39 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.