जिल्ह्यातील 20 नागरिकांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह


जिल्ह्यातील 20 नागरिकांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह


सातारा दि. 10 (जिमाका) : रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार सातारा जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय येथे अनुमानित म्हणून भरती असलेल्या 20 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये कराड तालुका - 12, वाई तालुका - 3, सातारा तालुका - 3, जावली तालुका - 1, फलटण तालुका - 1 असे एकूण 20 जणांचे रिपोर्ट कोरोना बाधित आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.


 


          बाधित रुग्णांमध्ये फलटण तालुक्यातील तांबवे येथील 25 वर्षीय पुरुष.


 


          जावळी तालुक्यातील ओझरे येथील 75 वर्षीय पुरुष.


 


          कराड तालुक्यातील तुळसण येथील 26, 60, 51 वर्षीय पुरुष, 28, 40 वर्षीय महिला, केसे येथील 50,42,64,20 व 60 वर्षीय महिला, 20 वर्षीय पुरुष. शिंदेवाडी येथील 42 वर्षीय् महिला.


 


          वाई तालुक्यातील वेरुळी येथील 46 वर्षीय पुरुष, 11 वर्षीय मुलगा , 26 वर्षीय महिला.


 


          सातारा तालुक्यातील कुसवडे येथील 19 व 47 वर्षीय महिला, देगांव येथील 55 वर्षीय पुरुष.