कराड तालुक्यातील तुळसण व केसे येथील 2 महिलांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह


कराड तालुक्यातील तुळसण व केसे येथील 2 महिलांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह. 


सातारा दि. 6 ( जि. मा. का ): कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे आज तपासणी करण्यात आलेल्या सोळा नमुन्यापैकी कराड तालुक्यातील तुळसण येथील 65 वर्षीय महिला व केसे येथील 32 वर्षीय महिला या दोन महिलांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह तर उर्वरित 14 जणांचे नमुने निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.


    वाई तालुक्यातील पसरणी येथे मुंबईवरुन प्रवास करुन आलेल्या 75 वर्षीय पुरुषाचा मुत्यू झाला असून मृत्यूपश्चात नमुना तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आला आहे.


211 जणांच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पुण्याला


वेणताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 13 ग्रामीण रुग्णालय वाई येथील 80, ग्रामीण रुग्णालय खंडाळा येथील 45, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 32 व रायगाव येथील 41 असे 211 अनुमानित रुग्णांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस. पुणे येथे पाठविण्यात आल्याची माहितीही डॉ गडीकर यांनी दिली.


Popular posts
1543 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 38 बाधितांचा मृत्यू
इमेज
सातारा जिल्ह्यात 1212 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 41बाधितांचा मृत्यू
इमेज
सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी शासनाचा मोठा निर्णय ; जिल्ह्याला मिळणार 38 रुग्णवाहिका - पालकमंत्री बाळासाहेब पाटील
इमेज
कराड चांदोली मार्गावर उंडाळे नजीक दुचाकी पुलावरून कोसळल्यामुळे भीषण अपघात. दोघे जण जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी.
इमेज
राज्यात 1 मेपर्यंत निर्बंध; नव्या नियमावलीनुसार काय सुरू, काय बंद?
इमेज