आज 19 रुग्ण कोरोनामुक्त


आजअखेर बऱ्या झालेल्यांची संख्या झाली 643


            सातारा दि. 21 ( जि. मा. का ) : विविध रुग्णालयांतील व कोरोना केअर सेंटर्समधून उपचार घेवून बरे झालेल्या 19 नागरिकांना 10 दिवसांनंतर डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.


            डिस्चार्ज दिलेल्यामध्ये क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथून शिरवळ ता. खंडाळा येथील 48 वर्षीय पुरुष, वेळे ता.वाई येथील 59 वर्षीय पुरुष.


कोरोना केअर सेंटर फलटण येथून फलटण तालुक्यातील वडले येथील वय 40, 89 व 30 वर्षीय पुरुष व वय 12 मुलगा व 1 वर्षाचे बाळ.


कोरोना केअर सेंटर पार्ले येथून कराड तालुक्यातील तुळसण येथील वय 50 व 22 वर्षीय महिला.


मायणी मेडीकल कॉलेज येथून खटाव तालुक्यातील सातेवाडी येथील 76 वर्षीय वृध्दा


कोरोना केअर सेंटर शिरवळ येथून खंडाळा तालुक्यातील आसवली येथील 25 वर्षीय पुरुष.


कोरोना केअर सेंटर वाई येथून वाई तालुक्यातील पाचवड येथील 52 वर्षीय पुरुष, व्याजवाडी येथील वय 58 27 व 29 वर्षीय पुरुष, 39 वर्षीय महिला तसेच 13 व 16 वर्षीय युवती, व आसरे येथील 55 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.