जिल्ह्यात आणखी 19 नागरिक कोरोनाबाधित


जिल्ह्यात आणखी 19 नागरिक कोरोनाबाधित


सातारा दि. 29 (जि. मा. का): विविध रुग्णालयांत व कोरोना केअर सेंअर मध्ये उपचार घेत असलेल्या जिल्ह्यातील 19 नागरिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.


या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये 12 पुरुष व 7 महिलांचा समावेश असून त्यातील 4 प्रवासी, 10 निकटसहवासित आणि 5 सारीचे रुग्ण आहेत.


 


जावली तालुक्यातील रामवाडी येथील 48 वर्षीय पुरुष व 22 वर्षीय युवक, वय 42, 48, 43 व 55 वर्षीय महिला, बामणोली तर्फे कुडाळ येथील 46 वर्षीय पुरुष, आखेगणी येथील 16 वर्षीय युवक.,


 


खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 83 वर्षीय वृध्द, व 31 वर्षीय महिला.,


 


सातारा तालुक्यातील दौलतनगर येथील 39 वर्षीय पुरुष, रेल्वेस्टेशन क्वार्टर येथील 39 वर्षीय पुरुष, जिहे येथील 68 वर्षीय पुरुष, लिंब येथील 40 वर्षीय 2 पुरुष, क्षेत्र माहूली येथील 50 वर्षीय पुरुष.,


 


वाई तालुक्यातील धरमपुरी येथील 35 वर्षीय पुरुष व ब्राम्हणशाई येथील 68 वर्षीय महिला.,


 


माण तालुक्यातील खडकी (पाटोळे) येथील 54 वर्षीय महिलेचा समावेश आहे.