ऑनलाईन पद्धतीने होणार 18 व 19 जून रोजी रोजगार मेळावा


ऑनलाईन पद्धतीने होणार 18 व 19 जून रोजी रोजगार मेळावा


अधिक माहितीसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागास संपर्क साधण्याचे आवाहन


 


सातारा दि. 11 ( जि. मा. का ) : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा कार्यालयामार्फत 18 व 19 जून रोजी ऑनलाईन पद्धतीने पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा ऑनलाईन पद्धतीने होणार असून या मेळाव्याचा जास्तीत जास्त युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी केले आहे.


 या मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्तपदे https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अधिसूचित करण्यात आलेली आहे. यासाठी या वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या आणि रिक्त पदासाठी पात्रतेप्रमाणे मॅचिंग होणाऱ्या किंवा ऑनलाईन ॲप्लाय केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती व्हिडीओ कॉन्फरन्स अथवा टेलीफोन (Skype, Whats App Video call,Telephonic, other Video calling App, etc.) याद्वारे ऑनलाईन मुलाखत घेण्यात येणार आहे. नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदासांठी आपली नोंदणी करावी. 


या रोजगार मेळाव्यात 10 वी, 12 वी, ट्रेनी, ऑपरेटर, हेल्पर, प्रोडक्शन इंजिनिअर, वेल्डर, प्रेस ऑपरेटर, पेंटर, मशिनिस्ट, फिटर, टर्नर, इलेक्ट्रिशिअन ॲन्ड वायरमन, सेल्स एक्झीक्युटीव्ह, डिझेल इंजिन मॅकेनिक, सब डिलर ऑफ पॉवर व्हेन्डोर, डिप्लोमा होल्डर, मॅकेनिकल/ऑटोमोबाईल इंजिनिअर, स्टिचिंग ऑपरेटर, ग्रॅज्युएट, एमबीएस, पोस्ट ग्रॅज्युएट अशा प्रकाराची 1 हजार 250 पेक्षा जास्त रिक्त पदे 22 उद्योजकांमार्फत सूचित करण्यात आली आहे. या पदांसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने ॲप्लाय करावे जेणेकरुन त्यांना मेळाव्यात सहभागी होता येईल.


याबाबत काही अडचणी असल्यास कार्यालयाच्या 02162-239938 या दूरध्वनीवर अथवा satararojgar@gmail.com या ईमेल आयडीवर संपर्क साधावा, असेही आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त श्री. जाधव यांनी केले आहे.