अखेर ग्रेड सेपरेटर 15 ऑगस्ट पूर्वी पूर्ण होणार पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे आदेश


अखेर ग्रेड सेपरेटर 15 ऑगस्ट पूर्वी पूर्ण होणार पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे आदेश


सातारा दि. 29 (जि. मा. का): सातारा जिल्ह्याच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा आणि जिल्ह्याच्या वैभवात भर घालणाऱ्या ग्रेड सेपरेटरचे काम पूर्णत्वास आले आहे. पावेई नाका ते कासकडे व पोवई नाका ते कोरेगावकडे जाणारा रस्ता येत्या 15 ऑगस्ट पूर्वी पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज दिले


पालकमंत्री श्री. पाटील यांनी आज ग्रेड सेपरेटरच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, अधिक्षक अभियंता शरद राजभोज, कार्यकारी अभियंता शंकर दराडे, उपभियंता राहूल अहिरे यांच्यास टीएनटी कंस्ट्रक्शन ग्रुपचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


ग्रेड सेपरेच्या कामाची मागणी ही बऱ्याच वर्षापूर्वीची होती. हे काम 2018 मध्ये सुरु करण्यात आले असून या कामावर आत्तापर्यंत 60 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. पोवई नाका येथे 8 रस्ते मिळतात, यामुळे नेहमीच वाहतुकीची कोंडी होत होती. हे काम पूर्ण झाल्यानंतर पोवई नाक्यावरील वाहतूक सुरळीत होणार आहे. उर्वरित ग्रेड सेपरेटचे काम येत्या नोव्हेंबर 2020 अखेर पूर्ण करण्याच्या सूचनाही पालकमंत्री श्री. पाटील यांनी संबंधितांना यावेळी केल्या.